
राष्ट्रीय ओळख माहिiती संकलनात चेहऱ्याची पडताळणी (Face Verification) जोडणारा पहिला देश सिंगापूर बनला.
- ‘Singpass face Verification’ या प्रोग्रॅम अंतर्गत राष्ट्रीय ओळख माहिती संकलनात चेहऱ्याची पडताळणी जोडली गेली आहे.
- याचा वापर करून लाभार्थ्यांना जवळपास 400 सरकारी सेवांवर ऑनलाईन प्रवेश करता येतो.
- चेहऱ्याची पडताळणी संगणक, मोबाईल, टॅब्लेट, इत्यादीवर वापरता यावी याप्रमाणेच डिझाईन केली आहे.
- देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी चेहरा ओळखण्याची (face verification )प्रणाली उत्तम प्रतिसाद देईल.
- एखाद्या व्यक्तीला ओळखणे, अथवा ती व्यक्ती खरोखरच समोर आहे का की त्याचे छायाचित्र, व्हिडिओ इत्यादी आहे हे देखील या प्रणालीद्वारा सुनिश्चित करता येईल.
- सिंगापूरच्या शासकीय तंत्रज्ञान एजन्सी (GovTech)साठी ही योजना Iproov व Toppan Ecquaria यांनी लागू केली आहे.
सिंगापूर
- पंतप्रधान – ली हिसियन लूंग
- चलन – सिंगापूर डॉलर
- सिमबॅक्स – भारत – सिंगापूर नाविक लढाई सराव
- स्वित्झर्लंडमधील Institute for management and Development (IMD) ने काढलेल्या जागतिक स्पर्धा निर्देशांमध्ये सिंगापूरने प्रथम स्थान पटकावले.
(भारत 43व्या स्थानावर)