राफेल नदालला इटालियन ओपनचे जेतेपद
- स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने इटालियन ओपन एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
- त्याने सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा पराभव केला.
- जोकोविचच्या ३६ एटीपी (असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स) मास्टर्स १००० विजेतेपदांशी नदालची बरोबरी
- दोघांतील सामन्यात अजुनही जोकोविचची २९-२८ अशी हुकुमत
- नदाल इटालियन स्पर्धेची अंतिम लढत १२ वेळा खेळत दहाव्यांदा विजेता ठरला.
- नदालने या स्पर्धेत ७५ पैकी ६८ लढती जिंकल्या.
- नदाल व जोकोविचने या स्पर्धेतील गेल्या १७ पैकी १५ स्पर्धा जिंकल्या आहेत.
- नदालची एकाच स्पर्धेत दहा किंवा त्यापेक्षा अधिक जास्त जेतेपद जिंकण्याची ही चौथी वेळ, यापूर्वी त्याने अशी कामगिरी फ्रेंच ओपन (१३), बार्सिलोना (१२) आणि माँटे कार्लो (११) येथे बजावली आहे.
- क्ले कोर्टवरील नदालचे ६२वे विजेतेपद
- नदालचे क्ले कोर्टवरील लढतीत ५०१ सामन्यात ४५९ विजय
- नदालची आता एकूण ८८ विजेतेपद, तर जिमी कॉनर्स (१०९), जोकोविच (८२) यानंतर तो तिसरा खेळाडू आहे.
- नदालने आतापर्यंत २० ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले आहे.
- नदालने अंतिम सामन्यात ७-५, १-६, ६-३ अशा प्रकारे जोकोविचचा पराभव केला.
इटालियन ओपन टेनिस स्पर्धा – २०२१
- आयोजन : ९ ते १६ मे २०२१
- आवृत्ती : ७८वी
- ठिकाण : रोम, इटली
- अंतिम सामना : राफेल नदाल – नोवाक जोकोविच
- क्ले टेनिस टूर्नामेंट
अ) वे क्ले कोर्ट
ब) कारपेट कोर्ट
क) हार्ड कोर्ट
ड) ग्रास कोर्ट
ATP (Association of Tennis Professionals) Tours Masters – १०००
- नऊ टेनिस टूर्नामेंट्सची शृंखला:
१) पॅरिस मास्टर्स
२) शांघाय मास्टर्स
३) सिनासिनाटी मास्टर्स
४) माद्रिद मास्टर्स
५) मोंटे कार्लो मास्टर्स
६) मियामी मास्टर्स
७) इंडियन वेल्स मास्टर्स
८) इटालियन मास्टर्स
९) कॅनिडियन मास्टर्स
- ATP मास्टर्स १००० हे ग्रँड स्लॅमपेक्षा वेगळे आहे.
- ग्रँड स्लॅममध्ये फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, बिंबलडन ओपन, अमेरिका ओपना या टुर्नामेंट्सचा समावेश होतो.