राज्याकडे गुंतवणुकीचा ओघ : सरकारचे 15 उद्योगांशी 35 हजार कोटींचे करार
- कोविड-19 मुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून संपूर्ण देशातील उद्योग व्यवहार ठप्प झाले असताना जगभरातील गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रालाच प्राधान्य दिले आहे.
- देशविदेशातील 15 मोठ्या उद्योगसमूहांनी राज्यात सुमारे 35 हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
- नव्या करारांमुळे राज्यात साधारणतः 23 हजार रोजगार निर्माण होतील.
- सरकारच्या उद्योग स्नेही धोरणामुळे येत्या दोन महिन्यांत आणखी काही मोठ्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे.
- टाळेबंदीमुळे ठप्प झालेले उद्योगचक्र पुन्हा सुरू करण्यासाठी उद्योग विभागाच्या वतीने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ जून महिन्यात करण्यात आला होता.
- पहिल्या टप्प्यात जूनमध्ये अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांशी 17 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले होते.
- सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देशविदेशातील 15 कंपन्यांमार्फत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासमवेत (MIDC) 34 हजार 850 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले.
- यातील बहुतांश उद्योग चाकण-पुणे, रायगड तसेच नवी मुंबई आणि मुंबईत उभे रहाणार आहेत.
क्र. | करार झालेल्या कंपन्या | गुंतवणूक (कोटी रु.) | रोजगार |
1 | मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया, जपान |
490 |
350 |
2 | ब्राईट सिनो होल्डिंग |
1800 |
1575 |
3 | ओरिएंटल एअरोमॅटिक्स |
265 |
350 |
4 | मालपाणी वेअर हाऊसिंग ॲण्ड इंडस्ट्रियल पार्क |
950 |
8000 |
5 | एव्हरमिंट लॉजिस्टिक |
345 |
2100 |
6 | पारिबा लॉजिस्टिक |
381 |
2200 |
7 | ईश्वर लॉजिस्टिक |
395 |
2200 |
8 | नेटमॅजिक आयटी सर्व्हिसेस प्रा. |
10555 |
575 |
9 | अदानी एन्टरप्रायझेस |
5000 |
1000 |
10 | मंत्रा डेटा सेंटर, स्पेन |
1125 |
80 |
11 | एसटीटी ग्लोबल डेटा |
825 |
800 |
12 | कोल्ट डेटा सेंटर होल्डिंग्ज इंडिया एलएलपी, ब्रिटन |
4400 |
100 |
13 | प्रिन्स्टन डिजिटल ग्रुप, सिंगापूर |
1500 |
300 |
14 | नेक्स्ट्रा |
2500 |
2000 |
15 | इएसआयआर इंडिया, सिंगापूर |
4310 |
1522 |
मॅग्नेटिक महाराष्ट्र :
- 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2018 दरम्यान मुंबईत मॅग्नेटिक महाराष्ट्र ही जागतिक दर्जाची औद्योगिक परिषद पार पडली.
- भागीदार : केंद्र सरकारचे मेक इन इंडिया अभियान, महाराष्ट्र सरकार, MIDC, CII हे भागीदार होते, तर KPMG कंपनी जाहिरात भागीदार होती.
- या परिषदेला 40000 पेक्षा जास्त व्यावसायिकांनी भेटी दिल्या. या काळात 150 पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
- या परिषदेत 12.1 लाख कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीचे आश्वासन उद्योजकांनी दिले. यासाठी महाराष्ट्र सरकार व उद्योजकांदरम्यान 401 MOU करार करण्यात आले.
- वरील 16 लाख कोटी रुपयांच्या (12.1+3.9) गुंतवणुकीमुळे 3.67 दशलक्ष रोजगार निर्मिती क्षमता प्राप्त होणार आहे.
- ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हे महाराष्ट्राच्या पाचव्या औद्योगिक धोरणाचे ब्रीदवाक्य होते.