राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
- 7 ऑगस्टला केंद्र शासनाने देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे केले आहे.
- देशभरातील नागरिकांच्या विनंतीमुळे सदर निर्णय घेण्यात आला, असे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
खेलरत्न पुरस्काराबद्दल :
- भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सन्मानार्थ 1991 पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला.
- हा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असून क्रीडा मंत्रालयाद्वारे दरवर्षी देण्यात येतो.
- 25 लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- 1991 मध्ये भारताचे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांना पहिला पुरस्कार जाहीर झाला.
- 2020 मध्ये रोहित शर्मा (क्रिकेट), मरिअप्पन थंगावेलू (पॅराॲथलेटिक्स), मनिका बत्रा (टेबल टेनिस), विनेश फोगाट (कुस्ती), राणी रामपाल (हॉकी) खेलरत्न पुरस्कार मिळाला.
मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल :
- मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात.
- त्यांनी 1926 ते 1949 या काळामध्ये हॉकी या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले.
- या काळामध्ये त्यांनी 400पेक्षा जास्त गोल्स केले आहेत.
- 1928, 1932 आणि 1936च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
- भारत सरकारने त्यांना 1956 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
- 2012 पासून 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
- नुकतेच महाराष्ट्र सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खासगी कंपन्यांना राजीव गांधी यांच्या नावाने नवीन पुरस्कार जाहीर करण्याचे ठरवले आहे.