मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार – २०२१
- कोणत्याही भाषेतील सर्वोत्तम पुस्तक व त्याच्या इंग्रजी अनुवादित पुस्तकास हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
- २०१४ पूर्वी हा पुरस्कार फक्त राष्ट्रकुल देशांच्या, आयरिश व दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांनी लिहिलेल्या अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी दिला जात होता.
- आधी दर दोन वर्षांनी दिला जाणारा पुरस्कार आता २०१६ पासून दरवर्षी इंग्रजीत भाषांतरित व ब्रिटनमध्ये प्रकाशित एका पुस्तकाला त्याच्या लेखक व भाषांतरकारास विभागून देण्यात येतो.
- स्थापना : २००४
- प्रत्यक्ष सुरुवात : २००५
- पहिले विजेते : इस्माईल कादारे (अल्बानिया)
- स्वरूप : ५०,००० पाउंड (६७,००० डॉलर्स)
- पुरस्कार देणारी संस्था : मॅन ग्रुप (इंग्लंड)
- आवृत्ती : बारावी
वर्ष | आवृत्ती | लेखक | पुस्तक | अनुवादक | देश |
२०२१ | १२ | डेव्हिड डिओप | अॅट नाइट ऑल ब्लड इज बॅक | एना मोरकोवाकिस | फ्रान्स |
२०२० | ११ | मॅरिएक लुकास रिजनेवेल्ड | द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हिनिंग | मिचेल हचिसन | नेदरलँड |
२०१९ | १० | जोखा अलहार्थी | सेलेस्टिअल बॉडीज | मॅरिलिन बुथ | ओमान |
२०१८ | ९ | ओल्गा टोकार्झुक | फ्लाईट्स् | जेनिफर क्रॉफ्ट | पोलंड |
At Night All Blood is Back :
- ही कादंबरी अल्फा नदियाये या पहिल्या महायुद्धात फ्रान्सकडून लढणाऱ्या सेनेगल सैनिकावर आधारित आहे.
- २०१८मध्ये फ्रांसिसी भाषेत प्रकाशित झालेल्या या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर २०२० मध्ये प्रकाशित झाले.
डेव्हिड डिओप:
- जन्म : १९६६ (पॅरिस)
- इंटरनॅशनल मॅन बुकर पुरस्कार जिंकणारे पहिले फ्रेंच लेखक.
- पाऊ विद्यापीठात १८ व्या शतकाच्या साहित्याचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
- ‘अॅट नाइट ऑल ब्लड इज बॅक’ ही डिओप यांची दुसरी कादंबरी असून फ्रान्समधील प्रमुख १० पुरस्कारांसाठी त्यास शॉर्टलिस्ट करण्यात आले होते.
- ‘प्रिक्स गॉन्कोर्ट देस लायकिन्स’ तसेच ‘स्विस प्रिक्स अहमादौ कोरौमा’ हे पुरस्कार या कादंबरीस मिळाले आहेत.
- सध्या १३ भाषांमध्ये अनुवादित केले जात असलेल्या या पुस्तकाने इटलीमधील स्ट्रेगा युरोपियन पुरस्कारही मिळविला आहे.
साहित्य :
अ) I’ Attraction Universelle (२०१२)
ब) At Night All Blood is Back (२०१८)