मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाइल (MRSAM)
- इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) च्या सहकार्याने भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल विकसित केली आहे.
- प्रकल्पाचे नाव – जमिनीवरून हवेत मारा करणारे
- निर्माते – डीआरडीओ (DRDO) आणि आयएआय (IAI)
- लांबी – 4.5 मी.
- ठिकाण – चांदीपूर (Integrated Test Range) वरून ओदिशा येथून यशस्वी चाचणी.
- विमानसदृश हालचाली करणाऱ्या हवेतील मानवविरहित लक्ष्याचा भेद करत क्षेपणास्त्राने गुणवत्ता व अचूकता सिद्ध केली.
- हे क्षेपणास्त्र सशस्त्र दलांना मध्यम रेंजवर विविध प्रकारच्या हवाई धमक्यांविरुद्ध संरक्षण क्षमता प्रदान करण्यासाठी विकसित केले आहे.
- डीआरडीओ आणि आयएआय मार्फत विकसित करून 2019मध्ये हवाई दलाकडे सोपविण्यात आले होते.
एमआरएसएएम (MRSAM) डिझाइन व वैशिष्ट्ये
- प्रत्येक MRSAM शस्त्र प्रणालीमध्ये एक कमांड, कंट्रोल सिस्टिम, ट्रॅकिंग रडार, मोबाईल लाँचर असतात.
- ट्रॅकिंग रडार वापरून धमकी ओळखता येते व तिचा मागोवा घेता येतो.
- लक्ष्याचा यशस्वी भेद करणाऱ्या अचूक आणि परिणामकारक क्षेपणास्त्राची निर्मिती केल्याने भारताचे स्थान बळकट झाले आहे.
संरक्षण संशोधन आणि विकाससंस्था (DRDO)
- स्थापना – 1958
- मुख्यालय – DRDO भवन, नवी दिल्ली
- मंत्रालय – संरक्षण मंत्रालय
- अध्यक्ष – डॉ. सतिश रेड्डी
- संरक्षण मंत्री – राजनाथ सिंह
मोटो (Motto) – बलस्य मूलं विज्ञानम् (Strength’s Origin is in knowledge)