
मिशन सागर अंतर्गत भारतामार्फत मोझँबिक सरकारला ५०० टन अन्न मदत
- भारताने २५ डिसेंबर २०२१ रोजी ५०० टन अन्नाची मदत मोझँबिक सरकारला दिली.
- भारतीय नौदलाच्या केसरी या जहाजाद्वारे ही मदत पुरविण्यात आली.
- मिशन सागर अंतर्गत भारताची ही मदत करण्याची आठवी वेळ आहे.
काय आहे मिशन सागर (SAGAR)?
- मिशन सागर (SAGAR-Security and Growth for All in the region)
- सुरुवात – १० मे २०२० (व्हिजन सागरचा एक भाग)
- उद्देश – कोविड १९ महामारी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संकटांना सामोरे जाण्यासाठी हिंदी महासागरातील देशांना मदत करणे.
- देश – मालदीव, मॉरिशस, मादागास्कर, कोनारोस आणि सेशेल्स
महत्त्वाचे
- मिशन SAGAR हे भारताच्या महत्त्वाकांक्षी व्हिजन सागरचा एक भाग आहे.
- हिंदी महासागरातील बेटांचे सामरिक आणि आर्थिक महत्त्व विचारात घेता भारताने २०१५ मध्ये व्हिजन सागर मोहिमेला सुरुवात केली.
व्हिजन सागर – २०१५
- याद्वारे भारत आपल्या सागरी शेजाऱ्यांशी आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य वाढविण्यासाठी मदत करतो.
- अॅक्ट ईस्ट पॉलिसी, प्रोजेक्ट सागरमाला, प्रोजेक्ट मौसम, यांसारख्या सागरच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांतून भारत आपले हिंदी महासागरातील देशांबरोबर अनुकूल संबंध बनवत आहे.