माजी सैनिकांना मिळकतकर माफ
- राज्यातील माजी सैनिक आणि दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नींना मिळकतकर १००% माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- चालू आर्थिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करत असलेल्या सर्व माजी सैनिकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
- त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात असलेल्या माजी सैनिकांना यापुढे मिळकतकर भरावा लागणार नाही.
- या योजनेला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे.
मिळकतकर माफीसाठी पात्रता निकष
- माजी सैनिक हा राज्यातील रहिवासी असावा.
- अधिवास (रहिवासी) प्रमाणपत्र सादर करावे लागणार.
- जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र अनिवार्य.
- केवळ एकाच मिळकतीसाठी करमाफी मिळणार.
- माजी सैनिक व त्यांची पत्नी हयात असेपर्यंत करमाफीचा लाभ मिळणार.
- अविवाहित माजी सैनिकांना आईवडील हयात असेपर्यंतच लाभ