मल्लखांबसहित गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या खेळांना अधिकृत मान्यता.
- क्रीडा मंत्रालयाने मल्लखांब, गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली.
- हरयाणा येथे पुढील वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत या चार खेळांचाही समावेश असेल.
महत्त्वाचे मुद्दे –
- खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा ह्या क्रीडा विकासाच्या सुधारित राष्ट्रीय कार्यक्रम ‘खेलो इंडिया’चा भाग असून 2017 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यास मंजूर केले आहे.
- दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या 1000 सहभागींना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी 8 वर्षांकरिता 500.000रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.
- देशभरातील खेळांना प्रोत्साहित करणे हेच ‘खेलो इंडिया’ योजनेचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे लोकसंख्या त्याच्या क्रॉस कटिंग प्रभावातून खेळाची ताकद वाढवू शकेल, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो.
- मुले आणि तरुणांचा समग्र विकास
- समुदाय विकास
- सामाजिक एकत्रिकरण
- लिंग समानता
- निरोगी जीवनशैली
- राष्ट्रीय अभिमान
- क्रीडा विकासाशी संबंधित आर्थिक संधी
- खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2021 मधील समाविष्ट खेळ –
|
|
|
|
नव्याने समाविष्ट केलेले खेळ –
अ. मल्लखांब – कुस्तीमध्ये प्राविण्य मिळविण्याच्या उद्देशाने मल्ल विशिष्ट लाकडी खांबावर अनेक कसरतींचे प्रकार करीत असल्याने त्यास हे नाव पडले.
- दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे व्यायाम शिक्षक बाळंभटदादा देवधर (1780-1852) यांनी मल्लखांबविद्येचे पुनरुज्जीवन केले.
- महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार, पंजाब, उत्तरप्रदेश, तमिळनाडू इ. राज्यांत खेळला जातो.
ब. गटका – पंजाब राज्यात खेळला जातो.
- निहांग शीख योद्ध्यांची ही पारंपरिक लढाई शैली स्वरक्षण तसेच खेळ म्हणूनही वापरली जाते.
- 6वे शिख गुरू हरगोविंद यांनी मुघल काळात स्वत:च्या बचावासाठी किर्पण (kirpan) स्वीकारला तेव्हा हा गट अस्तित्वात आला असे मानले जाते.
क. कलरीपायट्टू – तमिळ संगम साहित्यात कालारी हा शब्द रणांगण आणि युद्धक्षेत्र या दोन्ही गोष्टींचे वर्णन करण्यासाठी आढळतो.
- भारतीय मार्शल आर्टचा प्रकार जो प्रामुख्याने केरळमध्ये खेळला जातो.
ड. थांग – ता – हुयेन लँगलॉन या मणिपुरी मार्शल आर्टवर आधारित.
- यात थांग – ता म्हणजे सशस्त्र लढाई ज्यात तलवार (थांग) व भाला (ता) यांचा समावेश होतो.
खेलो इंडिया युवा स्पर्धा
आवृत्ती | वर्ष | यजमान (राज्य) | सर्वाधिक पदके मिळवणारे राज्य |
I | 2018 | दिल्ली | हरियाणा |
II | 2019 | पुणे (महाराष्ट्र) | महाराष्ट्र |
III | 2020 | गुवाहाटी (आसाम) | महाराष्ट्र |
IV | 2021 | हरियाणा | (आयोजित) |