भीमाशंकर साखर कारखान्यास पाचव्यांदा सर्वोत्कृष्ट सहकारी कारखाना पुरस्कार
- साखर उद्योगातील राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता पारितोषिके आज जाहीर करण्यात आली.
- यात सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठी देण्यात येणारा वसंतदादा पाटील पुणे पुरस्कार पाचव्यांदा पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास मिळाला आहे.
- उच्च उतारा विभागातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना – सहकारी खांड उद्योग, गणदेवी (गुजरात)
- उर्वरित विभागात सर्वोत्कृष्ट साखर कारखाना – नाजियाबाद साखर कारखाना (उत्तरप्रदेश)
पुरस्कार देणारी संस्था :
- गाळप हंगाम २०१९-२० मध्ये साखर उद्योगांत उत्तम कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना ‘नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी, लिमिटेड, नवी दिल्ली’ तर्फे जाहीर केला जातो.
पुरस्काराचे निकष :
अ) तांत्रिक गुणवत्ता
ब) ऊस उत्पादकता
क) वित्तीय व्यवस्थापन
ड) ऊस गाळप
इ) साखर उतारा
फ) साखर निर्यात
- यंदा २१ पारितोषिके जाहीर करण्यात आली असून देशभरातील ९२ तर राज्यातील ३७ साखर कारखान्यांचा यांत समावेश आहे.
राष्ट्रीय स्तरावरील अन्य पारितोषिक-विजेते:
अ) उत्कृष्ट ऊस उत्पादकता :
-
- डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, सांगली (प्रथम)
- अजिंक्यतारा साखर कारखाना, सातारा (द्वितीय)
ब) तांत्रिक कार्यक्षमता :
-
- विघ्नहर साखर कारखाना, जुन्नर (प्रथम)
- क्रांती अग्रणी डॉ. लाड सहकारी साखर कारखाना (द्वितीय)
क) उत्कृष्ट ऊस उत्पादकता उर्वरित विभाग :
-
- कर्नाल साखर कारखाना हरियाणा (प्रथम)
- किसान सहकारी चिनी मिल, उत्तरप्रदेश (द्वितीय)
ड) तांत्रिक कार्यक्षमता :
-
- साथियोन सहकारी साखर कारखाना आझमगड (प्रथम)
- कॅथर साखर कारखाना हरियाणा (द्वितीय)
इ) उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन :
-
- नर्मदा खांड उद्योग गुजरात (प्रथम)
- कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना जालना (द्वितीय)
ई) उर्वरित विभाग :
-
- चेय्यार सहकारी साखर कारखाना तमिळनाडू (प्रथम)
ऊस गाळप :
- खेडुत साखर कारखाना बारडोली, गुजरात,
- उर्वरित विभाग – रमाला साखर कारखाना, उत्तरप्रदेश
विक्रमी ऊस उतारा :
- कुंभी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर
- किसान साखर कारखाना, उत्तरप्रदेश
विक्रमी साखर निर्यात :
- जवाहर साखर कारखाना कोल्हापूर (प्रथम)
- सह्याद्री साखर कारखाना, कऱ्हाड (द्वितीय)
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना
- स्थापना – १९९९ (नोव्हेंबर २००० मध्ये प्रत्यक्ष ऊस गाळप सुरू)
- संस्थापक – सहकारमहर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील
- आता पर्यंत देश व राज्यपातळीवरील एकूण २२ पुरस्कार प्राप्त कारखाना
- साखर कारखाना उद्योगातील अग्रेसर संस्था भारतीय शुगर, पुणे यांचा ‘बेस्ट ओव्हरऑल परर्फॉर्मन्स को. ऑपरेटिव्ह शुगर मिल’ पुरस्कार
इतर माहिती :
- साखर उत्पादनात भारत जगात दुसरा (जगाच्या १७% उत्पादन)
- साखर उत्पान्नासह उत्पादनात ब्राझिल पहिला देश
- सहकारी तत्त्वावर सुरू झालेला भारतातील पहिला साखर कारखाना – १९४९ – पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सह. साखर कारखाना (प्रवरानगर)
- महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा – अहमदनगर (२३ कारखाने)
- महाराष्ट्रातील एकूण साखर कारखाने -१७४
- महाराष्ट्र उत्तरप्रदेशनंतर साखर उत्पादनात दुसरे राज्य.