भीमाशंकर साखर कारखान्यास पाचव्यांदा सर्वोत्कृष्ट सहकारी कारखाना पुरस्कार

भीमाशंकर साखर कारखान्यास पाचव्यांदा सर्वोत्कृष्ट सहकारी कारखाना पुरस्कार

  • साखर उद्योगातील राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता पारितोषिके आज जाहीर करण्यात आली.
  • यात सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठी देण्यात येणारा वसंतदादा पाटील पुणे पुरस्कार पाचव्यांदा पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास मिळाला आहे.
  • उच्च उतारा विभागातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना – सहकारी खांड उद्योग, गणदेवी (गुजरात)
  • उर्वरित विभागात सर्वोत्कृष्ट साखर कारखाना – नाजियाबाद साखर कारखाना (उत्तरप्रदेश)

पुरस्कार देणारी संस्था :

  • गाळप हंगाम २०१९-२० मध्ये साखर उद्योगांत उत्तम कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना ‘नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी, लिमिटेड, नवी दिल्ली’ तर्फे जाहीर केला जातो.

पुरस्काराचे निकष :

अ) तांत्रिक गुणवत्ता

ब) ऊस उत्पादकता

क) वित्तीय व्यवस्थापन

ड) ऊस गाळप

इ) साखर उतारा

फ) साखर निर्यात

  • यंदा २१ पारितोषिके जाहीर ‍करण्यात आली असून देशभरातील ९२ तर राज्यातील ३७ साखर कारखान्यांचा यांत समावेश आहे.

राष्ट्रीय स्तरावरील अन्य पारितोषिक-विजेते:

अ) उत्कृष्ट ऊस उत्पादकता : 

    • डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, सांगली (प्रथम)
    • अजिंक्यतारा साखर कारखाना, सातारा (द्वितीय)

ब) तांत्रिक कार्यक्षमता :

    • विघ्नहर साखर कारखाना, जुन्नर (प्रथम)
    • क्रांती अग्रणी डॉ. लाड सहकारी साखर कारखाना (द्वितीय)

क) उत्कृष्ट ऊस उत्पादकता उर्वरित विभाग :

    • कर्नाल साखर कारखाना हरियाणा (प्रथम)
    • किसान सहकारी चिनी मिल, उत्तरप्रदेश (द्वितीय)

ड) तांत्रिक कार्यक्षमता :

    • साथियोन सहकारी साखर कारखाना आझमगड (प्रथम)
    • कॅथर साखर कारखाना हरियाणा (द्वितीय)

इ) उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन :

    • नर्मदा खांड उद्योग गुजरात (प्रथम)
    • कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना जालना (द्वितीय)

ई) उर्वरित विभाग :

    • चेय्यार सहकारी साखर कारखाना तमिळनाडू (प्रथम)

ऊस गाळप : 

  • खेडुत साखर कारखाना बारडोली, गुजरात,
  • उर्वरित विभाग – रमाला साखर कारखाना, उत्तरप्रदेश

विक्रमी ऊस उतारा :

  • कुंभी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर
  • किसान साखर कारखाना, उत्तरप्रदेश

विक्रमी साखर निर्यात :

  • जवाहर साखर कारखाना कोल्हापूर (प्रथम)
  • सह्याद्री साखर कारखाना, कऱ्हाड (द्वितीय)

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना

  • स्थापना – १९९९ (नोव्हेंबर २००० मध्ये प्रत्यक्ष ऊस गाळप सुरू)
  • संस्थापक – सहकारमहर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील
  • आता पर्यंत देश व राज्यपातळीवरील एकूण २२ पुरस्कार प्राप्त कारखाना
  • साखर कारखाना उद्योगातील अग्रेसर संस्था भारतीय शुगर, पुणे यांचा ‘बेस्ट ओव्हरऑल परर्फॉर्मन्स को. ऑपरेटिव्ह शुगर मिल’ पुरस्कार

इतर माहिती :

  • साखर उत्पादनात भारत जगात दुसरा (जगाच्या १७% उत्पादन)
  • साखर उत्पान्नासह उत्पादनात ब्राझिल पहिला देश
  • सहकारी तत्त्वावर सुरू झालेला भारतातील पहिला साखर कारखाना – १९४९ – पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सह. साखर कारखाना (प्रवरानगर)
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा – अहमदनगर (२३ कारखाने)
  • महाराष्ट्रातील एकूण साखर कारखाने -१७४
  • महाराष्ट्र उत्तरप्रदेशनंतर साखर उत्पादनात दुसरे राज्य.

Contact Us

    Enquire Now