भारतीय विद्यापीठांचा पुन्हा जगभरात डंका
-
- शिक्षणक्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील भारतीय शिक्षण संस्थांनी ठसा उमटविला आहे.
- सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगने ‘जागतिक विद्यापीठ क्रमवारी – २०२१/२२’ जारी केली असून त्यामध्ये शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत भारतीय विद्यापीठे आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
- या क्रमवारीमध्ये आयआयएम अहमदाबादला ४१५वे स्थान मिळाले असून त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) ४५९व्या स्थानी आहे.
- या क्रमवारीमध्ये झळकलेल्या अन्य संस्थांमध्ये जेएनयू, बनारस हिंदू विद्यापीठ, आयआयटी रुरकी, आयआयटी गुवाहाटी, एम्स नवी दिल्ली, जादवपूर आणि कोलकाता विद्यापीठ आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांचा समावेश आहे.
- जागतिक पातळीवर हार्वर्ड विद्यापीठाने या क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावले असून त्यानंतर मॅसॅच्युसेट्स् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांचा क्रमांक लागतो.
- जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२१-२२ मध्ये जगभरातील २००० संस्थांचा समावेश असून भारतातील ६८ संस्थांना या क्रमवारीमध्ये स्थान मिळाले आहे.
देशातील दहा आघाडीच्या संस्था :
क्रमवारीतील स्थान | संस्था |
४१५ | आयआयएम, अहमदाबाद |
४५९ | आयआयएससी, बंगळूरू |
५४३ | टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई |
५५७ | आयआयटी, मद्रास |
५६७ | आयआयटी, मुंबई |
५७१ | दिल्ली विद्यापीठ |
६२३ | आयआयटी, दिल्ली |
७०८ | आयआयटी, खरगपूर |
७०९ | पंजाब विद्यापीठ |
८१८ | आयआयटी, कानपूर |