
भारताच्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी –
- 22 ऑक्टोबर रोजी भारताने राजस्थानच्या पोखरण फील्ड, फायरिंग रेंज येथे ‘नाग’ या रणगाडाभेदी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची (Anti Tank Guided Missile (ATGM)) 10वी व अखेरची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली.
- आता भारतीय सैन्यात दाखल होण्यास हे क्षेपणास्त्र सज्ज झाले आहे.
- नाग क्षेपणास्त्र हे नाग क्षेपणास्त्र वाहकातून (NAMICA) सोडण्यात आले.
- शत्रूच्या रणगाड्यांची आगेकूच थांबवण्यासाठी संरक्षण, संशोधन व विकास संघटनेने (DRDO) हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
- नाग क्षेपणास्त्र जमीन व हवा दोन्ही ठिकाणावरून लाँच करू शकतो.
- 3rd Generation ATGM असलेले हे क्षेपणास्त्र 4-7 कि.मी. दूरी वरील शत्रूचे रणगाडे दिवसा तसेच रात्री भेदू शकते.
- रणगाड्यांविरुद्ध भारत सध्या 2nd Generation मिलान 2T व कोंकूर ATGM वापरत आहे.
- यापूर्वी 15-16 जुलै 2020 रोजी DRDO ने ओदिशाच्या बालासोर किनाऱ्यावर ‘ध्रुवास्त्र’ या ATGM ची हेलीकॉप्टर विना चाचणी घेतली.
संरक्षण, संशोधन व विकास संघटना
Defence Research and Development Organisation (DRDO)
- अध्यक्ष – डॉ. द. सतीश रेड्डी
- मुख्यालय – नवी दिल्ली
- संबंधित मंत्रालय – संरक्षण मंत्रालय
- संरक्षण मंत्री – राजनाथ सिंग