ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द
- ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा आयोजित केलेला भारत दौरा अखेर कोरोना परिस्थितीमुळे रद्द करण्यात आला.
- भारतात कोविड-19 विषाणूचा नवा प्रकार सापडल्याने जॉन्सन यांचा दौरा रद्द करावा, यासाठी आग्रही भूमिका मांडण्यात आली होती.
- ब्रिटनविरोधी मजूर पक्षाचे नेते व इतरांशी चर्चा केल्यानंतर जॉन्सन यांची भारत भेट रद्द करण्यात आली.
- 28 एप्रिल रोजी एक दिवसासाठी हा दौरा आयोजित केला हाेता.
- याआधी जॉन्सन हे 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते, त्यावेळीही दौरा रद्द करण्यात आला होता.