ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
- 30 सप्टेंबर 2020 रोजी ओदिशाच्या चांदीपूर येथील ‘इंटिग्रेटेड टेस्ट रेंज’ (ITR) कडून सुमारे 400 किलोमीटरच्या स्ट्राइक रेंजसह पृष्ठभाग ते पृष्ठभाग सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि ब्राह्मोस एअरोस्पेस लिमिटेड यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते.
- देशी बूस्टर, एअर फ्रेम विभाग, प्रोपल्शन सिस्टिम, वीजपुरवठा आणि इतर अनेक प्रमुख स्वदेशी घटकांसह ही चाचणी घेण्यात आली.
- या चाचणीने देशी घटकांची क्षमता सिद्ध केली. जी उच्च स्ट्राइक रेंज मिळवण्यासाठी वापरली जात होती.
ठळक मुद्दे :
- DRDO च्या PJ-10 प्रकल्पांतर्गत गोळीबार चाचणी करण्यात आली.
- भारत हा मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमे (MTCR) चा सदस्य बनल्यानंतर ब्राह्मोसची स्ट्राईक रेंज 290 कि.मी. वरून 450 कि.मी. पर्यंत वाढवण्यात आली.
- हे 300 किलो वजनाचे पारंपरिक वॉरहेड ठेवण्यास सक्षम आहे.
ब्राह्मोसबद्दल थोडक्यात :
ठिकाण – इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूर (ओदिशा)
क्षेपणास्त्राचे नाव – ब्रह्मपुत्रा (भारत), मोस्कोवा (रशिया) या नद्यांच्या नावावरून
उत्पादक – ब्राह्मोस एअरोस्पेस लिमिटेड (भारताच्या DRDO आणि रशियाच्या NPOM) चा संयुक्त उपक्रम
- भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलात तैनात.
- जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल.
- रशियाच्या ‘पी-800 ऑनिक्स’ क्षेपणास्त्रावर आधारित.
- जमीन, पाणी आणि आकाशातून डागता येणार .
- मारक पल्ला : 450 कि.मी.
- लांबी : 4.8 मीटर
- वजन : 3000 किलोग्रॅम
- वेग : 2.8 ते 3 मॅक
अलिकडील संबंधित :
- 7 सप्टेंबर 2020 रोजी DRDO ने दुसऱ्या प्रयत्नात स्वदेशी विकसित स्क्रॅमजेर प्रोपल्शन सिस्टिमचा वापर करून हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमोन्टर व्हेइकलची (HSTDV) यशस्वी चाचणी केली.
DRDO बद्दल :
- अध्यक्ष : डॉ. जी. सतिश रेड्डी
- मुख्यालय : नवी दिल्ली