प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार SAIL ला घोषित
- वर्ल्ड एन्व्हायर्नमेंट फाउंडेशनने २०२१ वर्षीचा प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार SAIL (Steel Authority Of India) या कंपनीला घोषित करण्यात आला.
- SAILचा हा सलग तिसरा पुरस्कार आहे.
स्थापना : १९९८ मध्ये वर्ल्ड एन्व्हायर्नमेंट फाउंडेशनद्वारा हा पुरस्कार स्थापन करण्यात आला.
- कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची स्पर्धा वाढविण्यासाठी या पुरस्काराने प्रोत्साहित केले जाते.
- SAIL ने नाविन्यपूर्ण घनकचरा व्यवस्थापन, जलसंधारण, वृक्षारोपण, कार्बन फूटप्रिंट कमी करणे यामध्ये अप्रतिम कामगिरी करत हा पुरस्कार प्राप्त केला.
SAIL – Steel Authority of India.
- स्थापना – २४ जानेवारी १९७३
- मुख्यालय – नवी दिल्ली
- भारतातील ११ महारत्न कंपन्यांपैकी एक २०१० मध्ये महारत्न हा दर्जा मिळाला.