पॅरालिम्पिकमध्ये भारत
- जपानची राजधानी टोकियोमध्ये सुरू असलेल्या पॅरालिंम्पिकमध्ये क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.
- ५ सुवर्णपदकांसह भारताने चोविसावे स्थान पटकावले.
इतिहास पॅरालिम्पिकचा
- १९४८च्या लंडन ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी स्टोक मांडेविले हॉस्पिटलचे डॉक्टर लुडविग गट्टमन यांनी दुसऱ्या महायुद्धात मणक्याच्या दुखापतीमुळे जायबंदी झालेल्या ब्रिटिश सैनिकांसाठी पहिल्या व्हीलचेअर स्पर्धेचे आयोजन केले.
- त्यानंतर चार वर्षांनी या स्पर्धेत इस्रायली सैनिकांनी भाग घेतला.
- या स्पर्धा ‘स्टोक मांडेविले गेम्स’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
- पहिली अधिकृत पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा १९६० मध्ये इटलीची राजधानी रोममध्ये झाली.
- १९८८ मध्ये पहिल्यांदा पॅरालिम्पिक स्पर्धा सोल ऑलिम्पिकनंतर त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आणि तेव्हापासून या स्पर्धा उन्हाळी ऑलिम्पिकनंतर काही दिवसांनी त्याच शहरात आयोजण्याची प्रथा रूढ झाली.
भारताचे पॅरालिम्पिकमधील पहिले पदक
- मुरलीधर पेटकर यांनी १९७२ मध्ये पश्चिम जर्मनीच्या हायडलबर्गमध्ये ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण प्रकारात भारतासाठी पहिले पदक सुवर्णपदकाच्या रूपाने पटकावले.
- भारताने १९६८ पासूनच सहभाग घेण्यास सुरुवात केली.
२०१६ रिओ पॅरालिम्पिक स्पर्धा
- या स्पर्धेत भारताने २ सुवर्ण, १ रजत, १ रौप्यपदक असे एकूण ४ पदके पटकावले.
२०२० टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा – (५ सुवर्ण, ८ रौप्य, ६ कांस्य)
- कोविडमुळे २०२०च्या स्पर्धा उशिराने म्हणजेच २४ ऑगस्ट २०२१ ते ५ सप्टेंबर २०२१ या दरम्यान जपानची राजधानी टोकियो येथे भरविण्यात आल्या.
- भारताचे १९ पदकांसह चोविसावा क्रमांक पटकावला.
- ही स्पर्धा सुरू होईपर्यंत म्हणजेच २०१६ रिओ पॅरालिम्पिकपर्यंत भारताची एकूण पदकसंख्या १२ इतकी होती.
- यंदा ५४ जणांचे पथक भारतातर्फे सहभागी झाले.
- खेळाडू आणि पदकांची यादी पुढीलप्रमाणे
सुवर्णपदक – (पाच)
१) अवनी लेखारा – नेमबाजी – R२ १० मीटर एअर रायफल SH 1 महिला गट
२) सुमीत अंतिल – भालाफेक – F ६४ पुरुष गट
३) मनिष नरवाल – नेमबाजी – संयुक्त P४ ५० मीटर पिस्टल SH 1 – पुरुष गट
४) प्रमोद भगत – बॅडमिंटन – एकेरी SL 3 पुरुष गट
५) कृष्णा नागर- बॅडमिंटन – एकेरी SL पुरुष गट
रौप्य पदक (आठ)
१) भाविना पटेल – टेबल टेनिस – एकेरी क्लास – ४ महिला गट
२) निशाद कुमार – उंच उडी – T ४७ पुरुष गट
३) योगेश काथुनिया – थाली फेक – F५६ पुरुष गट
४) देवेंद्र झाझेरिया – भाला फेक – F ४६ पुरुष गट
५) मरिय्यपन थंगवलु – उंच उडी – T ६३ पुरुष गट
६) प्रवीण कुमार – उंच उडी – T ६४ पुरुष गट
७) सिंहराज अधाना – नेमबाजी – संयुक्त ५० मीटर
पिस्टल SH १ पुरुष गट
८) सुहास यथिराज – बॅडमिंटन SL ४ पुरुष गट
कांस्य पदक (सहा)
१) सुंदर सिंग गुर्जर – भालाफेक F ४६ पुरुष गट
२) सिंहराज अधाना – नेमबाजी – P१ १० मीटर एअर पिस्टल पुरुष गट
३) शरद कुमार – उंच उडी – T ६३ पुरुष गट
४) अवनी लेखारा – नेमबाज R८ ५० मीटर रायफल महिला गट
५) हरविंदर सिंग – तिरंदाजी – रिकर्व – पुरुष गट
६) मनोज सरकार – बॅडमिंटन – SL३ पुरुष गट