पुद्दुचेरीसाठी घटकराज्य दर्जाची मागणी

पुद्दुचेरीसाठी घटकराज्य दर्जाची मागणी

 • अलिकडेच, पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाला घटकराज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.
 • पुद्दुचेरीसाठी राज्यत्वाची मागणी हा प्रदीर्घ प्रलंबित प्रश्न आहे.
 • स्वातंत्र्यानंतर १९४९मध्ये भारतातील राज्यांची अ, ब, क आणि ड अशा चार गटात विभागणी करण्यात आली.
 • गट अ : पूर्वीचे ब्रिटिश भारत प्रांत ज्यात राज्यपाल आणि विधानमंडळ होते.
 • गट ब : पूर्वीची संस्थाने जी राजप्रमुखाद्वारे शासित होती.
 • गट क : मुख्य आयुक्तांचे प्रांत आणि काही संस्थाने जी मुख्य आयुक्तांद्वारे शासित होते.
 •  गट ड : अंदमान आणि निकोबार बेटांचा प्रदेश जो केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या लेफ्टनंट गव्हर्नरद्वारे शासित होता.
 • १९५६च्या राज्य पुनर्रचना कायद्यानंतर, गट क आणि गट ड राज्ये ‘केंद्रशासित प्रदेश’ नावाच्या एकाच श्रेणीमध्ये एकत्र केली गेली. 

पुद्दुचेरी

 • पुद्दुचेरी शहर हे आग्नेय भारतातील पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे.
 • भारताच्या आग्नेय भागातील कोरोमंडल किनार्‍यालगत पाँडिचेरी (आता पुद्दुचेरी) आणि कराईकल, पूर्वेकडील किनार्‍याजवळ यानम आणि केरळ राज्याने वेढलेल्‍या पश्चिम मलबार किनार्‍यावर असलेले माहे यांची मिळून पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशाची स्थापना झाली आहे.
 • १६७४मध्ये पुद्दुचेरी फ्रेंचांनी एका स्थानिक शासकाकडून विकत घेतले.
 • तेव्हापासून १९५४ पर्यंत पुद्दुचेरी हा फ्रेंचांचा प्रदेश होता. १९५४मध्ये फ्रेंचांनी पुदुच्चेरी भारताकडे हस्तांतरित केली.
 • त्यानंतर १९६२ पर्यंत पुद्दुचेरीला अधिग्रहित क्षेत्र (acquired territory) मानण्यात आले.
 • १९६२मध्ये १४व्या घटनादुरुस्तीद्वारे पुद्दुचेरीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.
 • भारतीय संविधान संसदेला विद्यमान राज्यांमधून नवीन राज्ये निर्माण करण्याचा किंवा एक राज्य दुसऱ्या राज्यामध्ये विलीन करण्याचा अधिकार देते. या प्रक्रियेला राज्यांची पुनर्रचना म्हणतात.
 • भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २ नुसार, संसद कायद्याने नवीन राज्ये स्थापन करू शकते.
 • भारतीय राज्यघटनेच्या कलम ३ नुसार, संसदेला राज्य स्थापन करण्याचा, कोणत्याही राज्याचा आकार वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा आणि कोणत्याही राज्याच्या सीमा किंवा नावात बदल करण्याचा अधिकार आहे.

अगोदर केंद्रशासित प्रदेश असणारी घटकराज्ये : 

 • हिमाचल प्रदेश : १९७१ मध्ये घटकराज्याचा दर्जा
 • मणिपूर आणि त्रिपुरा : १९७२
 • मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा : १९८७

Contact Us

  Enquire Now