परदेशी वित्त प्रेषणाच्या (Remittances) प्राप्तीमध्ये भारत जगात अव्वल (२०२१)
- जागतिक बँकेने १७ नोव्हेंबर २०२१ रोजी विस्थापन व विकास टिप्पणी (Migration & Development Brief) नामक अहवाल जाहीर केला.
- त्यानुसार अनिवासी भारतीयांकडून प्राप्त होणाऱ्या पैशांनुसार भारताने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
- ऑक्टोबर २०२१पर्यंत अनिवासी भारतीयांनी तब्बल ८७ अब्ज डॉलर्स इतकी रक्कम भारतात पाठवली आहे. (२०२० साली ८३ अब्ज डॉलर्स)
- यामध्ये युनायटेड स्टेट्सचा सर्वाधिक २०% पेक्षा अधिक वाटा आहे.
- २०२१मध्ये Remittances प्राप्त होणारे पहिले पाच देश
१) भारत
२) चीन
३) मेक्सिको
४) फिलिपाइन्स
५) इजिप्त
- जागतिक बँक वर्षातून दोनदा हा अहवाल प्रकाशित करते.
जागतिक बँक
- स्थापना – डिसेंबर १९४५
- मुख्यालय – वॉशिंग्टन डीसी (USA)
- अध्यक्ष – डेव्हिड मालपास