पंतप्रधानांकडून ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’, इ- गोपाल अ‍ॅप व बिहारमधील अनेक प्रकल्पांची घोषणा

पंतप्रधानांकडून ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’, इ- गोपाल अ‍ॅप व बिहारमधील अनेक प्रकल्पांची घोषणा 

 • १० सप्टेंबर रोजी आसामच्या मासेमारांची नोंदणी करून नरेंद्र मोदींनी मत्स्यपालन क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने ही योजना सुरू केली आहे. 
 • देशातील मत्स्योद्योग व नीलक्रांतीचा समन्वय, शेतकरी व मत्स्योत्पादक यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या व्यापक उद्दिष्टाने हा प्रयत्न करण्यात आला. 
 • २१ राज्यांमध्ये २०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची ही योजना असून आपले गाव आपला देश आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना आहे. 
 • बिहारचे राज्यपाल फागू चौहान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग, राज्य मंत्री कुमार बल्याण (मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धशाळा मंत्रालयाचे) हे या उद्घाटनावेळी उपस्थित होते. 
 • सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत ही योजना राबवण्यात येणार आहे. 
 • मत्स्य उत्पादन, मत्स्य व्यवसायासाठी पायाभूत सुविधा, व्यवस्थापन इत्यादी बाबींमधील कमतरता दूर करून या क्षेत्राचा विकास करणे हे उद्दिष्ट आहे. 
 • ही योजना केंद्रीय योजना तसेच केंद्र पुरस्कृत योजना आहे. 
 • सागरी आंतर्देशीय मत्स्य व्यवसायासाठी १२,३४० कोटी व मत्स्य व्यवसायाशी निगडित पायाभूत सुविधांसाठी ७७१० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 
 • या योजनेअंतर्गत येत्या तीन-चार वर्षांमध्ये मत्स्य निर्यात दुप्पट करणे हे मुख्य ध्येय आहे. 

अपेक्षित परिणाम : 

१. २०२४-२५ पर्यंत अतिरिक्त ७० लाख टन मत्स्योत्पादन करणे. 

२. २०२४-२५ पर्यंत निर्यातीमध्ये मत्स्योत्पादनाचा वाटा दुप्पट करून, १ लाख कोटीपर्यंत नेणे. 

३. हंगामोत्तर हानीचे प्रमाण २०-२५% वरून १०% पर्यंत आणणे. 

४. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ६० लाख रोजगार निर्मिती करणे. 

 • लाभार्थींना या प्रकल्पांतर्गत ४०% निधी व तो SC/ST किंवा महिला असल्यास ६०% निधी उपलब्ध करून देण्यात येईल. 
 • केंद्रशासित प्रदेशांमध्ये १००% केंद्राचा वाटा.
 • ईशान्येकडील व हिमालयीन राज्ये ९०: 
 • सर्वसाधारण राज्ये ८०: 
 • याप्रमाणे केंद्राचे व राज्याचे हिस्से ठरवण्यात आले. 

मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या संबंधित उद्घाटन :

फिश ब्रूड बँक :

 • सीतामढी येथे फिश ब्रूड बँक व किशनगंज येथे जलचर संदर्भात रोगाविषयी प्रयोगशाळा यांचे उद्घाटन झाले. 

फिश ऑन व्हील्स:

 • पंतप्रधानांनी नीलक्रांती अंतर्गत मधेपुरा येथे, एक युनिट फिश गिरणी व पटना येथे ‘फिश ऑन व्हील्स’ चे दोन युनिट यांचे उद्घाटन केले. 

मासे उत्पादन विस्तृत तंत्रज्ञान केंद्र :

 • या केंद्राचे डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ, पुसा येथे उद्घाटन झाले.

इ-गोपाल अ‍ॅप 

 • हे शेतकर्‍यांसाठी जातींच्या व्यापक सुधारणा करण्यासाठीची बाजारपेठ व थेट वापरासाठीच्या माहितीचे पोर्टल आहे. 
 • मध्यस्थाविना शेतकर्‍यांना चांगल्या प्रतीचे पशुधन निवडण्यास व मिळविण्यास हे अ‍ॅप मदत करेल. 
 • गुरांच्या संगोपन, उत्पादन ते आरोग्यासह आहाराची माहिती या अ‍ॅपवर मिळेल.
 • प्राण्यांच्या आधार नंबरवरून या अ‍ॅपद्वारे त्या प्राण्याची संपूर्ण माहिती दिली जाईल. 

पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित उद्घाटन :

 • प्रधानमंत्र्यांनी ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत स्थापित केलेल्या अत्याधुनिक सुविधांसह सीमेन स्टेशनचे उद्घाटन केले. 
 • ७५ एकर जागेवर व ८४.२७ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले हे स्टेशन पूर्णिया, बिहार येथे स्थापण्यात आले.

कृत्रिम गर्भधारणा प्रयोगशाळा :

 • प्रधानमंत्र्यांनी ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गतच कृत्रिम गर्भधारणा प्रयोगशाळेचे (In Vitro Fertilization Lab) बिहार पशुविज्ञान विद्यापीठ, पटना येथे उद्घाटन केले. 
 • देशभरात एकूण ३० भ्रूण हस्तांतरण तंत्रज्ञान (ETT) व IVF Lab स्थापन केल्या जात आहेत. 
 • देशी जातीच्या उच्चभ्रू जनावरांचा प्रचार करण्यासाठी व त्यायोगे दूध उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठी ही प्रयोगशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

लिंगानुसार वेगळे केलेले वीर्य :

 • प्रधानमंत्र्यांनी ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गतच बडोणी दूध संघ, बेगुसरायतर्फे कृत्रिम रेतनात लिंगानुसार वीर्य वापरण्याची योजना सुरू केली. 
 • ज्यात वर्गीकरणानुसार वीर्य वापरल्याने केवळ मादी बछडे (कालवडी) जन्माला येतील ज्याने देशातील दूध उत्पादन वाढेल. 

गोकुळ मिशन :

 • देशात स्वदेशी जनावरांच्या जाती विकसित करणे यासाठी देशव्यापी कृत्रिम गर्भधारणा कार्यक्रम होता. 
 • २०१९ मध्ये या मिशनची सुरुवात झाली. त्यानंतर पूर्णिया, पटना, बरौनी येथे आधुनिक फॅसिलिटीज बांधल्या.
 • पूर्णिया केंद्र सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एक आहे, ज्याचा फायदा पूर्व भारताला होईल. 

मिशन डॉल्फिन:

 • डॉल्फिनच्या संरक्षणासाठी, शाश्वत मासेमारीसह अनेक उपाययोजना करून त्यांच्या संवर्धनाला चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२० रोजी सुरू केले.

खाद्य प्रक्रिया उद्योग व संशोधन केंद्र : 

 • ‘जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गावाजवळच अन्नप्रक्रिया उद्योग व संशोधन केंद्रे स्थापन करण्यात येतील. 
 • सरकार कृषी पायाभूत सुविधा, शेतकरी उत्पादक संस्था, शीतगृहे इत्यादी सुविधा विकसित करण्यासाठी ‘कृषी पायाभूत सुविधा विकास निधी’ स्थापन करेल व त्यासाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात येईल.

Contact Us

  Enquire Now