
न्यूझीलंडने २०२१ अपेकची ऑकलँड समिट रद्द केली आणि व्हर्च्युअल समिटची निवड केली
- न्यूझीलंडचे उपपंतप्रधान विंस्टन पीटर्स यांनी ३० जून २०२० रोजी घोषणा केली की कोविड-१९ या साथीच्या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नियोजन आणि सुरक्षेच्या कारणास्तव २०२१ आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन (अपेक) मंच रद्द केला आणि समिट एक व्हर्च्युअल (आभासी) कार्यक्रम म्हणून आयोजित केले जाईल.
- सरकारविरूद्धच्या हिंसक निषेधामुळे चिलीने २०१९ ची नेत्यांची बैठक रद्द केली आणि २०२० ची अपेकची व्हर्च्युअल समिट मलेशिया आयोजित करीत आहे.
- न्यूझीलंडने परत आलेल्या नागरिक आणि रहिवाशांना वगळता प्रत्येक देशाच्या सीमा बंद केल्या आहेत.
- आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन / अपेकबद्दल :
- अपेकची स्थापना १९८९ रोजी झाली असून त्याचे मुख्यालय सिंगापूर येथे आहे.
- पॅसिफिक महासागराभोवतीचे आणि पूर्व आशियाई देश अशा एकवीस राष्ट्रांची ही संघटना आहे.
- सध्या अपेकचे चेअरमन मुहिद्दिन यासीन हे आहेत तर कार्यकारी संचालक डॉ. रेबेका फातिमा स्टा. मारिया या आहेत.
- भारत अपेकचा सदस्य नाही आणि मुक्त व्यापारही नाही.
- सध्या अपेकपैकी दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूर, थायलंड व मलेशिया या देशांबरोबर भारताचा उभयपक्षी व्यापारी करार आहे