नकदी फळांच्या जागतिक बाजारपेठेत हिस्सेदारी वाढविण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम
- केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री नरेद्रसिंह तोमर यांनी बागायतीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बागायती “क्लस्टर डेव्हलपमेंटची प्रोग्रॅमची” (सीडीपी) सुरुवात केली.
- प्रायोगिक अवस्थेत, कार्यक्रमासाठी निवडलेल्या एकूण ५३ क्लस्टरपैकी १२ बागायती गटामध्ये हा उपक्रम राबविला जाईल.
- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय बागायती मंडळाने (एनएचबी) राबविलेल्या केंद्रीय क्षेत्रातील कार्यक्रम सीडीपीचा हेतू आहे की जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी बागायती गटांची ओळख करून त्यांचा विकास करणे.
- क्लस्टर विकास कार्यक्रमामुळे कृषी क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून, 10 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल. ३५०० कोटी रुपयांची गुंतवणूक खासगी क्षेत्राची असेल.
- नकदी फळपिकांची आयात कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढवून निर्यातीला प्रोत्साहन देणे या उद्देशाने क्लस्टर विकास कार्यक्रम राबवला आहे.
- या कार्यक्रमातून फळफळावळांची निर्यात २० टक्क्यांनी वाढेल असा अंदाज
पहिल्या टप्प्यातील क्षेत्रे
- सफरचंद – शोपियाँ (जम्म-काश्मिर), किनौर (हिमाचल प्रदेश)
- आंबा – लखनौ (UP), कच्छ (गुजरात), मेहबुबनगर (तेलंगणा)
- केळी – अनंतपुर (आंध्रप्रदेश), थेनी (तामिळनाडू)
- द्राक्ष – नाशिक (महाराष्ट्र)
- अननस – सिफालीजाला (त्रिपुरा)
- डाळिंब – सोलापूर (महाराष्ट्र), चित्रदुर्ग (कर्नाटक)
- हळद – वेस्ट जयंतिया हिल्स (मेघालय)