नकदी फळांच्या जागतिक बाजारपेठेत हिस्सेदारी वाढविण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम

नकदी फळांच्या जागतिक बाजारपेठेत हिस्सेदारी वाढविण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम

  • केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री नरेद्रसिंह तोमर यांनी बागायतीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बागायती “क्लस्टर डेव्हलपमेंटची प्रोग्रॅमची” (सीडीपी) सुरुवात केली.
  • प्रायोगिक अवस्थेत, कार्यक्रमासाठी निवडलेल्या एकूण ५३ क्लस्टरपैकी १२ बागायती गटामध्ये हा उपक्रम राबविला जाईल.
  • कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय बागायती मंडळाने (एनएचबी) राबविलेल्या केंद्रीय क्षेत्रातील कार्यक्रम सीडीपीचा हेतू आहे की जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी बागायती गटांची ओळख करून त्यांचा विकास करणे.
  • क्लस्टर विकास कार्यक्रमामुळे कृषी क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून, 10 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल. ३५०० कोटी रुपयांची गुंतवणूक खासगी क्षेत्राची असेल.
  • नकदी फळपिकांची आयात कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढवून निर्यातीला प्रोत्साहन देणे या उद्देशाने क्लस्टर विकास कार्यक्रम राबवला आहे.
  • या कार्यक्रमातून फळफळावळांची निर्यात २० टक्क्यांनी वाढेल असा अंदाज

पहिल्या टप्प्यातील क्षेत्रे

  • सफरचंद – शोपियाँ (जम्म-काश्मिर), किनौर (हिमाचल प्रदेश)
  • आंबा – लखनौ (UP), कच्छ (गुजरात), मेहबुबनगर (तेलंगणा)
  • केळी – अनंतपुर (आंध्रप्रदेश), थेनी (तामिळनाडू)
  • द्राक्ष – नाशिक (महाराष्ट्र)
  • अननस – सिफालीजाला (त्रिपुरा)
  • डाळिंब – सोलापूर (महाराष्ट्र), चित्रदुर्ग (कर्नाटक)
  • हळद – वेस्ट जयंतिया हिल्स (मेघालय)

Contact Us

    Enquire Now