दिल्ली मंत्रिमंडळाने पहिल्यांदाच ‘वृक्ष प्रत्यारोपण धोरण’ मंजूर केले.
- 9 ऑक्टोबर 2020 रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखालील दिल्लीच्या मंत्रिमंडळाने ‘वृक्ष प्रत्यारोपण धोरण’ मंजूर केले.
- असे धोरण मंजूर करणारे दिल्ली पहिलेच राज्य आहे.
- या धोरणानुसार विकास किंवा बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित वृक्षांपैकी 80% वृक्ष पुनर्रोपण केले जातील व त्यांपैकी किमान 80% झाडे जगायला हवीत याची जबाबदारी परवानगी घेणाऱ्या एजन्सीची असेल.
- त्यासाठी दिल्ली सरकार एजन्सीजचे पॅनेल तयार करेल व संबंधित सरकारी विभाग त्यांच्याशी संपर्क साधतील. मात्र 1 वर्षानंतर 80% झाडे जगल्यासच या एजन्सीजला पैसे दिले जातील.
धोरणाविषयी महत्त्वाचे मुद्दे
-
- दिल्लीतील वायुप्रदूषणाविरुद्ध असलेली चळवळ ‘युद्ध, प्रदूषण के विरुद्ध’ चाच हे धोरण एक भाग आहे.
- झाड कापण्यासाठी किमान 10 रोपे लावणे आवश्यक. तसेच झाडाला एका जागेवरून उपटून दुसऱ्या जागेवर लावणे.
- सरकार व समित्यांनी प्रत्यारोपण केलेल्या झाडांवर नजर ठेवण्यासाठी व कामाची अचूकता प्रमाणित करण्यासाठी एक समर्पित वृक्ष प्रत्यारोपण कक्ष तयार केला जाईल.