तुकाराम शंकर कुळकर्णी
जन्म – 3 सप्टेंबर 1932 (कळमनुरी, हिंगोली)
निधन – 10 एप्रिल 2019
अल्पपरिचय :
- मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकर्ता
- 1961 साली कला शाखेतील पदवी प्राप्त केली
- मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर औरंगाबाद मधील सरस्वती भुवन महाविद्यालयात प्राध्यापक व नंतर विभागप्रमुख
- 1952 ते 1957 या काळात कवितालेखन
- पु. शि. रेगेंच्या ‘छंद’ पासून ते ‘वाचा’ पर्यंतच्या ‘लिटल मॅगझिन’ चळवळीशी त्यांचा संबंध
- 1995 पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य
- 15 वर्षे त्यांनी ‘प्रतिष्ठान’ या मराठवाडा साहित्य परिषदेच्या मुखपत्राचे संपादन केले
- संघटन कौशल्यामुळे साहित्य महामंडळ आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्यिकांना प्रोत्साहन दिले
कथासंग्रह :
अ) सुरणाची वेदना (1955)
ब) रेखा (1960)
क) अखेरच्या वळणावर (1982)
काव्यसंग्रह :
कानोसा (1992)
इतर :
क्रांती मार्गावरील प्रवासी (1993), स्वातंत्र्योत्तर मराठी कविता:1960 ते 1980 (1994)
पुरस्कार व सन्मान :
2016 – महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार
2002 – 23 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (औरंगाबाद)