डॉ. काजल चक्रबर्ती यांना २०२० चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार जाहीर
- केंद्रीय सागरी मच्छिमारी संशोधन संस्थेतील (CMFRI) मुख्य वैज्ञानिक डॉ. काजल चक्रबर्ती यांना भारतीय अन्न संशोधन परिषदेचा (Indian Council of Agricultural Research) नॉर्मन बोरलॉग पुरस्कार जाहीर झाला आहे.
- सागरी शैवालापासून त्यांनी विविध जीवनशैलीजन्य रोगावर उपचार ठरू शकतील अशा औषधी पोषक उत्पादनांची निर्मिती केली.
- त्यांचे कृषी पर्यंतचे शिक्षण बंगालमध्ये तर पदव्युत्तर शिक्षण व पीएचडीचे काम ICMR मधून केले.
चक्रबर्ती यांच्या संशोधनाची वैशिष्ट्ये
- त्यांनी पोषण व औषध या दोन्ही दिशांनी काम केले आहे. औषधी पोषक उत्पादने त्यांनी सागरी शैवालापासून तयार केली.
- हाडांचा ठिसूळपणा हा अलिकडे वाढत असलेला रोग, कारण आपल्याला अन्नातून पुरेशी पोषके मिळत नाहीत, यावर त्यांनी काम केले आहे.
- अँटीऑस्टीपोरोटिक द्रव्ये त्यांनी शोधले आहे.
- हृदयाचा संधिवात, टाईप २ मधुमेह, डिसुलिपीडडिमिया (जास्त कोलेस्टॅरॉल), अतिरक्तदाब, हायपरथायरॉडिझम यावर त्यांनी पोषकांचे उपाय शोषले आहेत.
- जीवाणूजन्य आजारावरही त्यांनी काम केले असून हेटेरॉफिक जीवाणूचा वापर त्यांनी अनेक औषधांना दाद न देणाऱ्या रोगजंतूंवरही केला आहे.
- सागरातील पदार्थांचा वापर अन्न रसायनशास्त्रासाठी करून त्यातून नवीन उत्पादने तयार करण्यात त्यांनी मोठे यश मिळविले आहे.
- “कॅडलमिन” हा त्यांनी हरित शैवालापासून तयार केलेला अर्क अनेक रोगांवर गुणकारी ठरला आहे.
चक्रबर्ती यांना मिळालेले पुरस्कार
- सी. वी. कुलकर्णी तरुण वैज्ञानिक पुरस्कार
- टी. जे. पांडियन पुरस्कार
- ए. जे. मॅटी पुरस्कार
- प्राण व्होरा पुरस्कार
नॉर्मन बोरलॉग पुरस्काराबद्दल
- पाच वर्षांतून एकदा हा पुरस्कार दिला जातो.
- १० लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.
- हा पुरस्कार मिळालेल्या वैज्ञानिकास पुढील पाच वर्षांच्या संशोधनासाठी १.५ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येते.