डॉ. कल्याण बॅनर्जी
जन्म : १९३८
मृत्यू : १६ एप्रिल २०२१
- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (एनआयव्ही) माजी संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले.
- ते ८३ वर्षांचे होते.
- १९८८ ते १९९७ या काळात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
- बॅनर्जी हे विषाणू विज्ञान, लसीकरण आणि साथीचे रोग या विषयातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ होते.
- डॉ. बॅनर्जी हे मुळचे कोलकाता येथील होते. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून १९६१ मध्ये एमबीबीएस पूर्ण केले. १९६८ मध्ये पी. एचडी पूर्ण केली.
- १९७३ पासून राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत कार्यरत होते.
- डास गटातील डेंग्यू विषाणूचे जनुकीय मार्कर सर्वप्रथम डॉ. बॅनर्जी यांनी निश्चित केले.
- विषाणूचा उगम आणि प्रसार हा त्यांचा अभ्यासाचा भाग होता.
- टिश्यू कल्चर प्रकारात कायसनूर फॉरेस्ट डिसीज (केएफडी) वरील लस सर्वप्रथम त्यांनी तयार केली.
- जागतिक आरोग्य संघटनेसारख्या महत्त्वाच्या संघटनाच्या वैज्ञानिक सल्लागार गटामध्ये समावेश होता.
- पश्चिम भारतातील एचआयव्ही संसर्गाच्या प्रसाराचा सखोल अभ्यास होता.
- तुलसी रामायण आणि संस्कृत या विषयामध्ये त्यांचा व्यासंग होता.
पुरस्कार
- २००९ – पद्मश्री – वैद्यकीय क्षेत्रातील विशिष्ठ सेवेबद्दल