
डॉ. अँटनी हेवीश
- जन्म – ११ मे १९२४, युनायटेड किंग्डम
- मृत्यू – २३ सप्टेंबर २०२१
जीवन परिचय
- रेडिओ लहरींच्या माध्यमातून अवकाशाचा विनाअडथळा वेध घेणे यासाठी नोबेल मिळणारे वैज्ञानिक डॉ. अँटनी हेवीश यांचे निधन झाले.
- त्यांनी ‘पल्सार’ म्हणजे स्पंदक ताऱ्यांचा शोध लावला होता.
- रेडिओ दुर्बीण तयार करून पल्सारमधून बाहेर पडणाऱ्या रेडिओ लहरीच्या माध्यमातून अवकाशाचा विनाअडथळा वेध घेतला.
- त्यासाठी त्यांना मार्टीन रायल यांच्यासमवेत १९७४ चा नोबेल पुरस्कार मिळाला होता.
- दुसऱ्या जागतिक महायुद्धात लढाऊ विमाने रडारपासून कशी वाचवायची या प्रकल्पात त्यांचा सहभाग होता.
- केंम्ब्रिज रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ग्रुप या संस्थेने १९६८ रोजी ‘नेचर’ मध्ये डॉ. हेवीश यांचा शोधनिबंध प्रसिद्ध केला होता.
- फ्रॅंकलिन इन्स्टिट्यूटने पल्सारच्या शोधाचे श्रेय बेल व हेविश या दोघांना दिले.
- हेविश रेडिओ खगोलशास्त्र या विषयाचे केम्ब्रिज विद्यापीठात प्राध्यापक होते.
- १९७१-८९ काळात ते मुलार्ड रेडिओ खगोलशास्त्र वेधशाळेचे प्रमुख होते.