
झिका व्हायरस
- गेल्या आठवड्यापासून केरळमध्ये झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
- खबरदारी म्हणून कर्नाटक राज्य सरकारने राज्यामध्ये या व्हायरससंबंधी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या
व्हायरससंबंधी :
- हा व्हायरस Flavivirus या गटातील असून तो Aedes या डासाद्वारे पसरतो
- याच डासांमुळे डेंग्यू, चिकनगुनिया व पीतज्वर हे आजार होतात.
- दोन प्रकारच्या Aedes डासांमुळे झिका व्हायरस पसरतो
- उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये Aedes aegypti तर तुलनेने थंड प्रदेशांमध्ये Aedes albopictus
- हा डास सहसा दिवसा किंवा संध्याकाळी चावतो.
- साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये तो त्याची अंडी घालतो.
- झिका व्हायरस हा गरोदर आईकडून बाळाकडे संक्रमित होऊ शकतो. तसेच रक्तदान,अवयव दान लैंगिक संबंध यामुळेसुद्धा संक्रमित होऊ शकतो.
पार्श्वभूमी:
- झिका व्हायरस सर्वप्रथम १९४७ मध्ये युगांडा देशातील झिका जंगलामध्ये एका Rheasus माकडात सापडला.
- १९५२ मध्ये युगांडा आणि टांझानियामध्ये तो सर्वप्रथम मनुष्यामध्ये आढळला.
- २००७ मध्ये पॅसिफिक प्रदेशात फ्रेंच पॉलिनेशिया या बेटांवर सर्वप्रथम त्याचा उद्रेक (outbreak) झाला.
- त्यानंतर अनेक देशांमध्ये असे उद्रेक दिसून आल्याने २०१६ साली जागतिक आरोग्य संघटनेने झिका व्हायरस ही एक जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली.
लक्षणे :
- झिका व्हायरसची लक्षणे डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखीच परंतु कमी तीव्रतेची असतात.
- त्यामध्ये स्नायू आणि सांधे दुखणे, ताप, शरीरावर लाल चट्टे, डोळ्यांना सूज येणे, डोके दुखणे इत्यादी लक्षणांचा समावेश होतो.
- अनेकदा नेमकेच जन्म झालेल्या बाळांमध्ये Microcephaly हा आजार दिसून येतो. यामध्ये जन्मताच बाळाचे डोके खूप छोटे असते व त्याच्या मेंदूचा अतिशय कमी विकास झालेला असतो. बऱ्याचदा बाळ दगावण्याची सुद्धा शक्यता असते.
उपचार :
- साधारणतः २ ते ७ दिवसांमध्ये रुग्ण बरा होऊन जातो.
- या व्हायरसवर आतापर्यंत कोणतीही लस आलेली नाही. परंतु साधारण उपचारांनीसुद्धा हा आजार बरा होतो. उदा. भरपूर पाणी पिणे, आराम करणे, ताप आणि दुखण्याच्या गोळ्या खाणे यांनी सुद्धा रुग्ण बरा होतो.
- २०१६ मध्ये भारत बायोटेक, हैदराबाद येथील शास्त्रज्ञांनी या व्हायरसवर २ लसी तयार केल्याचा दावा केला होता. परंतु अजून त्यांना परवानगी मिळायची बाकी आहे.