ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन
- आपल्या उत्कृष्ट – कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
- वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांनी अभिनयास सुरुवात केली. भारदस्त शरीरयष्टी, दमदार आवाज, झुपकेदार मिश्या यांच्या जोरावर त्यांनी खलनायक, सरपंच, पुढारी इ. भूमिका साकारल्या.
- १९४४ मध्ये बालगंधर्व व आचार्य अत्रे नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष असताना त्यांनी वयाच्या अवघ्या साडे सहाव्या वर्षीच बाल नाट्यात भूमिका केली होती.
- मुंबईच्या रिझर्व्ह बँकेत नोकरी करत त्यांनी नाटकाची हौस भागवली.
- १९७४ मध्ये त्यांनी रत्नाकर मतकरींसोबत ‘अरण्यक’ हे नाटक पहिल्यांदा केले वयाच्या ८२ व्या वर्षी त्याच नाटकात त्यांनी ‘धृतराष्ट्राची’ भूमिका उत्तम प्रकारे केली.
- मृत्यू अटळ आहे पण मृत्यूला लांब उभे राहायला भाग पाडायचे ही माझी जिद्द आहे असे म्हणणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांनी ६ डिसेंबर २०२० रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
- त्यांनी २०० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत व १२५ हून अधिक नाटकांत अभिनय केला.
अन्य नाटके
- प्रपंच करावा नेटका
- हृदय स्वामिनी
- बेकेट
- माऊबंदकी
- अरण्यक
- कौमेय
- मुद्राराक्षस
चित्रपट
- अशा असाव्या सुन्या
- उंबरठा
- तेजाब (हिंदी)
- प्रतिघात (हिंदी)
- बिनकामाचा नवरा
- सिंहासन
- तक्षक (हिंदी)
मालिका
- आमची माती आमची माणसं
- गप्पागोष्टी
- अग्गबाई सासुबाई
- तेरा पन्ने