जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा विधेयक २०२० मंजूर
- २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जम्मू-काश्मीर भाषा विधेयक २०२० ला मंजुरी दिली.
- या कायद्यानुसार आधी असलेल्या उर्दू व इंग्रजी या भाषांसह ‘काश्मिरी, डोगरी व हिंदी’ या नव्याने बनलेल्या जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या अधिकृत भाषा असतील.
- त्यामुळे आता जम्मू-काश्मीरच्या ५ अधिकृत भाषा राहतील.
- हे विधेयक पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाचे केंद्रमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मांडले होते.
- संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येईल.
इतर माहिती:
- ४ मे २०२० रोजी पुलित्झर पुस्तक पुरस्कारासाठी तीन भारतीय छायाचित्रकारांची निवड करण्यात आली.
- १. दार यासीन, २. मुख्तार खान, ३. छन्नी आनंद
- यांना ३७० कलम हटवल्यानंतर व कोरोना लॉकडाऊन काळात जम्मू-काश्मीरची अपवादात्मक स्थिती दाखवण्याच्या धैर्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला.
जम्मू व काश्मीर :
- नायब राज्यपाल – मनोज सिंह
- राजधानी – श्रीनगर (उन्हाळा) जम्मू (हिवाळा)