जम्मू आणि काश्मिरचे माजी नायब राज्यपाल गिरिशचंद्र मुर्मू यांची भारताच्या कॅगपदी नियुक्ती

जम्मू आणि काश्मिरचे माजी नायब राज्यपाल गिरिशचंद्र मुर्मू यांची भारताच्या कॅगपदी नियुक्ती

  • ५ ऑगस्ट २०२० रोजी जम्मू आणि काश्मिरचे पहिले नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. (मनोज सिन्हा यांची जम्मू-काश्मिरचे नवे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती)
  • त्यानंतर त्यांची नेमणूक ८ ऑगस्ट २०२० रोजी भारताचे १४ वे महालेखापरीक्षक (CAG) म्हणून राष्ट्रपतीद्वारे करण्यात आली.
  • मुर्मू यांना २०२४ पर्यंतचा कार्यकाळ लाभणार आहे.

गिरीशचंद्र मुर्मू

  • ८ ऑगस्ट २०२० रोजी भारतीय नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.
  • जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल
  • १९८५ च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील गुजरात केडरचे अधिकारी

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG)

  • भारतीय राज्यघटनेत कलम १४८ मध्ये या पदाची स्वतंत्र तरतूद
  • केंद्र व राज्ये या दोन्ही स्तरांवर देशाच्या पूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण करतात.
  • नियुक्ती – राष्ट्रपतींद्वारे
  • कार्यकाल – ६ वर्षे किंवा ६५ पूर्ण यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंतचा कार्यकाळ.
  • पदच्युती – सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे 
  • राजीनामा – राष्ट्रपतींकडे

महत्त्वाचे

  • भारतीय लेखा व लेखापरीक्षण विभागातील कर्मचार्‍यांच्या सेवाशर्ती राष्ट्रपती महालेखापरीक्षकांशी विचारविनिमय करून ठरवतात.
  • टी. एस. आर. सुब्रह्मण्यम यांनी ‘कॅग’ यास ‘दंतहीन कागदी वाघ’ असे संबोधले.
  • कॅग यांना भारताच्या मुख्य निर्वाचक आयुक्ताच्या बरोबरीचा दर्जा असतो.
  • कॅगला लोकलेखा समितीचे कान आणि डोळे म्हणून संबोधले जाते.
  • भारताचे पहिले कॅग – व्ही. नरहरी राव (१९४८ – १९५४)
  • १३ वे कॅग – राजीव महर्षी (२०१७ – २०२०)
  • १४ वे कॅग – गिरीशचंद्र मुर्मू (२०२०)

Contact Us

    Enquire Now