छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीच्या संवर्धनासाठी २३ कोटी
- छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, जतन व सुशोभीकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी २३ कोटी रुपयांची मंजुरी
- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनास चालना देण्यासाठी ही घोषणा.
- या निधीतून किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केला जाईल असे राज्य पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.
या निधीतून होणारे काम
- पुरातत्त्व विभाग, वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध कामे
- अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचे पुनरुज्जीवन
- पाथवेची सुधारणा, रॉककट् गुहांचे पुनरुज्जीवन, पर्यटनाच्या सोयी-सुविधा शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा इ.
उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिला निर्णय
- छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याचा पहिला निर्णय २८ नोव्हेंबर २०१९ रोजी घेतला.
राज्य पर्यटन मंत्रालय
- मंत्री – माननीय आदित्य ठाकरे
- महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा – १९९९पासून पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग
- जागतिक पर्यटन दिन – २७ सप्टेंबर (१९८० पासून सुरुवात)
- २०२० ची संकल्पना – पर्यटन आणि ग्रामीण विकास – २०२० (Tourism and Rural Development)