ग्रीसमध्ये हवामान संकटाला सामोरे जाण्यासाठी मंत्रालयाची स्थापना
- ग्रीस सरकारने हवामान बदलाच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी नवीन मंत्रालयाची स्थापना केली आहे.
- एव्हिया बेट व दक्षिण ग्रीसमधील जंगलातील वणव्यामुळे १००० चौरस किमी (३८५ चौरस मैल) जंगल नष्ट झाले आहे, या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
- हे मंत्रालय हवामान बदलामुळे वाढत्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी आपत्ती निवारण व अग्निशमन धोरणांचा विचार करेल.
- युरोपियन युनियनचे माजी आयुक्त ख्रिस्तोस स्टायलिनाइड्स यांची येथे मंत्री म्हणून नियुक्ती केली.
- २०१४ आणि २०१९ दरम्यान मानवतावादी मदत आणि व्यवस्थापन आयुक्त म्हणून ते कार्यरत होते.
इतर महत्त्वाच्या बाबी
- २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये हवामान आणिबाणी जाहीर केली होती.
- ब्रिटननंतर आयर्लंड हवामान आणिबाणी घोषित करणारा दुसरा देश ठरला.