खेलो इंडियाची देशात १४३ तर, महाराष्ट्रात ३६ केंद्रांना मंजुरी
- केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने देशातील सात राज्यांना १४३ समर्पित ‘खेलो इंडिया’ केंद्र सुरू करण्यास मंजुरी देऊन १४.३० कोटी रुपये निधीही त्यासाठी मंजूर केला आहे.
- या प्रत्येक केंद्रात एका क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- हेतू : देशात तळागाळापर्यंतच्या खेळाडूंना उत्तम दर्जाचे क्रीडा साहित्य आणि सुविधा तसेच प्रशिक्षण मिळवून देणे.
- येत्या चार वर्षात एक हजारापेक्षा अधिक क्रीडा केंद्रे सुरू करण्याची योजना असून त्याअंतर्गत २१७ क्रीडा केंद्रे देशात स्थापन झाली आहेत.
- ईशान्य भारतातील राज्ये, जम्मू-काश्मीर, अंदमान निकोबार आणि लडाख या सर्व ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक दोन केंद्रे सुरू केली जाणार आहेत.
- २०२८ च्या ऑलिंपिकमध्ये भारताला पहिल्या १० देशांत स्थान मिळवून देण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडाकौशल्य असलेल्या मुलांची पारख करून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
- खेलो इंडिया केंद्रे व निधीचे वाटप:
राज्य | निधी | केंद्रे |
अरुणाचल प्रदेश | ४.१२ कोटी | ५२ |
महाराष्ट्र | ३.६० कोटी | ३६ |
कर्नाटक | ३.१० कोटी | ३१ |
मणिपूर | १.६० कोटी | १६ |
मध्यप्रदेश | ५० लाख | ४ |
मिझोराम | २० लाख | २ |
गोवा | २० लाख | २ |