खेलो इंडियाची देशात १४३ तर, महाराष्ट्रात ३६ केंद्रांना मंजुरी

खेलो इंडियाची देशात १४३ तर, महाराष्ट्रात ३६ केंद्रांना मंजुरी

  • केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने देशातील सात राज्यांना १४३ समर्पित ‘खेलो इंडिया’ केंद्र सुरू करण्यास मंजुरी देऊन १४.३० कोटी रुपये निधीही त्यासाठी मंजूर केला आहे.
  • या प्रत्येक केंद्रात एका क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • हेतू : देशात तळागाळापर्यंतच्या खेळाडूंना उत्तम दर्जाचे क्रीडा साहित्य आणि सुविधा तसेच प्रशिक्षण मिळवून देणे.
  • येत्या चार वर्षात एक हजारापेक्षा अधिक क्रीडा केंद्रे सुरू करण्याची योजना असून त्याअंतर्गत २१७ क्रीडा केंद्रे देशात स्थापन झाली आहेत.
  • ईशान्य भारतातील राज्ये, जम्मू-काश्मीर, अंदमान निकोबार आणि लडाख या सर्व ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक दोन केंद्रे सुरू केली जाणार आहेत.
  • २०२८ च्या ऑलिंपिकमध्ये भारताला पहिल्या १० देशांत स्थान मिळवून देण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडाकौशल्य असलेल्या मुलांची पारख करून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
  • खेलो इंडिया केंद्रे व निधीचे वाटप:

 

राज्य निधी केंद्रे
अरुणाचल प्रदेश ४.१२ कोटी ५२
महाराष्ट्र ३.६० कोटी ३६
कर्नाटक ३.१० कोटी ३१
मणिपूर १.६० कोटी १६
मध्यप्रदेश ५० लाख
मिझोराम २० लाख
गोवा २० लाख

Contact Us

    Enquire Now