‘कैसर-ए-हिंद’ अरुणाचल प्रदेशचे राज्य फुलपाखरू
- चमकदार रंगाचे ‘कैसर-ए-हिंद’ हे अरुणाचल प्रदेशचे अधिकृत राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आले आहे.
- कैसर-ए-हिंद याचा अर्थ भारताचा सम्राट असा होतो.
- राज्य फुलपाखरू घोषित करणारे अरुणाचल प्रदेश देशातील सहावे राज्य ठरले आहे.
- यापूर्वी महाराष्ट्र, उत्तराखंड, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू (२०१९) या राज्यांनी आपले अधिकृत राज्य फुलपाखरू घोषित केले आहे.
- महाराष्ट्र (२०१५) हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य आहे.
कैसर-ए-हिंद विषयी :
- वैज्ञानिक नाव : Teinopalpus Imperialis
- हे अत्यंत दुर्मिळ आणि स्वेलोरेल फुलपाखरांपैकी एक आहे.
- ऑर्डर : लेपिडोप्टेरा
- आढळ : समशीतोष्ण सदाहरित जंगले, पूर्व आणि पश्चिम हिमालय
- ९०-१२० मिमी पंख असलेले हे फुलपाखरू पूर्व हिमालयात पश्चिम बंगाल, मेघालय, आसाम, सिक्कीम आणि मणिपूर या राज्यांत आढळते.
संरक्षण स्थिती :
अ) IUCN – धोक्याच्या जवळ (Near threatened)
ब) CITES – परिशिष्ट – II
क) वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ – अनुसूची – II
इतर :
- नुकतेच गोल्डन बर्डविंग (Troides aeacus) नावाचे हिमालयीन फुलपाखरू ८८ वर्षांनंतर भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू म्हणून सापडले आहे.
विविध राज्यांचे राज्य फुलपाखरू
अ) महाराष्ट्र – ब्लू मोरमॉन
ब) उत्तराखंड – कॉमन पीकॉक
क) कर्नाटक – सदर्न बर्ड विंग्ज
ड) केरळ – मलबार बँडेड पीकॉक
इ) तमिळनाडू – तमिळ येओमन