‘कैसर-ए-हिंद’ अरुणाचल प्रदेशचे राज्य फुलपाखरू

‘कैसर-ए-हिंद’ अरुणाचल प्रदेशचे राज्य फुलपाखरू

  • चमकदार रंगाचे ‘कैसर-ए-हिंद’ हे अरुणाचल प्रदेशचे अधिकृत राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • कैसर-ए-हिंद याचा अर्थ भारताचा सम्राट असा होतो.
  • राज्य फुलपाखरू घोषित करणारे अरुणाचल प्रदेश देशातील सहावे राज्य ठरले आहे.
  • यापूर्वी महाराष्ट्र, उत्तराखंड, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू (२०१९) या राज्यांनी आपले अधिकृत राज्य फुलपाखरू घोषित केले आहे.
  • महाराष्ट्र (२०१५) हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य आहे.

कैसर-ए-हिंद विषयी :

  • वैज्ञानिक नाव : Teinopalpus Imperialis
  • हे अत्यंत दुर्मिळ आणि स्वेलोरेल फुलपाखरांपैकी एक आहे.
  • ऑर्डर : लेपिडोप्टेरा
  • आढळ : समशीतोष्ण सदाहरित जंगले, पूर्व आणि पश्चिम हिमालय
  • ९०-१२० मिमी पंख असलेले हे फुलपाखरू पूर्व हिमालयात पश्चिम बंगाल, मेघालय, आसाम, सिक्कीम आणि मणिपूर या राज्यांत आढळते.

संरक्षण स्थिती :

अ) IUCN – धोक्याच्या जवळ (Near threatened)

ब) CITES – परिशिष्ट – II

क) वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ – अनुसूची – II

इतर : 

  • नुकतेच गोल्डन बर्डविंग (Troides aeacus) नावाचे हिमालयीन फुलपाखरू ८८ वर्षांनंतर भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू म्हणून सापडले आहे.

विविध राज्यांचे राज्य फुलपाखरू

अ) महाराष्ट्र – ब्लू मोरमॉन

ब) उत्तराखंड – कॉमन पीकॉक

क) कर्नाटक – सदर्न बर्ड विंग्ज

ड) केरळ – मलबार बँडेड पीकॉक

इ) तमिळनाडू – तमिळ येओमन

Contact Us

    Enquire Now