कृष्ण बलराम रथयात्रा पंजाबचा राज्योत्सव म्हणून जाहीर
- पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी कृष्ण बलराम रथयात्रा या पंजाबमध्ये होणाऱ्या उत्सवास पंजाब राज्याचा वार्षिक उत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.
- तसेच त्यांनी लुधियाना मधील इस्कॉन मंदिरासाठी अडीच कोटींच्या अनुदानाची घोषणा केली.
- कोरोनामुळे मागील दोन वर्षे हा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता.
- तसेच पटियाला येथे २० एकर जागेमध्ये पंजाब सरकार भगवद्गीता आणि रामायण संशोधन केंद्र स्थापन करणार आहे.
- इस्कॉन या संस्थेद्वारे ही रथयात्रा दरवर्षी आयोजित केली जाते.
- ओदिशामधील पुरीच्या जगन्नाथयात्रेनंतर ही भगवान कृष्णासाठी आयोजित सर्वात मोठी यात्रा गणली जाते.
इतर काही सण :
- हॉर्नबिल उत्सव, आवोलिंग उत्सव (कोन्याक जमात), मोआत्सु उत्सव : नागालँड
- बिहू उत्सव (नृत्य), माजुली उत्सव, आंबूबाची उत्सव : आसाम
- लोसार, मिओको, द्री, तोर्ग्या, मोपिन उत्सव : अरुणाचल प्रदेश
- खर्ची पूजा, गरिया पूजा : त्रिपुरा
- लाई हरोबा उत्सव (मैतेयी जमात) : मणिपूर
- छापचर कूट उत्सव : मिझोराम
- वांगला आणि नोङ्क्रेम उत्सव : मेघालय
- नुआखाई : ओदिशा
- सरहूल, तुसू : झारखंड
- पोंगल : तामिळनाडू
- हरेली : छत्तीसगढ़
- तिज : उत्तर भारत
- छट पूजा : बिहार
- ओणम : केरळ
- लोसार उत्सव : सिक्कीम
- गोची उत्सव : हिमाचल प्रदेश