कृष्ण बलराम रथयात्रा पंजाबचा राज्योत्सव म्हणून जाहीर

कृष्ण बलराम रथयात्रा पंजाबचा राज्योत्सव म्हणून जाहीर

  • पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी कृष्ण बलराम रथयात्रा या पंजाबमध्ये होणाऱ्या उत्सवास पंजाब राज्याचा वार्षिक उत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.
  • तसेच त्यांनी लुधियाना मधील इस्कॉन मंदिरासाठी अडीच कोटींच्या अनुदानाची घोषणा केली.
  • कोरोनामुळे मागील दोन वर्षे हा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता.
  • तसेच पटियाला येथे २० एकर जागेमध्ये पंजाब सरकार भगवद्गीता आणि रामायण संशोधन केंद्र स्थापन करणार आहे.
  • इस्कॉन या संस्थेद्वारे ही रथयात्रा दरवर्षी आयोजित केली जाते.
  • ओदिशामधील पुरीच्या जगन्नाथयात्रेनंतर ही भगवान कृष्णासाठी आयोजित सर्वात मोठी यात्रा गणली जाते.

इतर काही सण :

  • हॉर्नबिल उत्सव, आवोलिंग उत्सव (कोन्याक जमात), मोआत्सु उत्सव : नागालँड
  • बिहू उत्सव (नृत्य), माजुली उत्सव, आंबूबाची उत्सव : आसाम
  • लोसार, मिओको, द्री, तोर्ग्या, मोपिन उत्सव : अरुणाचल प्रदेश
  • खर्ची पूजा, गरिया पूजा : त्रिपुरा
  • लाई हरोबा उत्सव (मैतेयी जमात) : मणिपूर
  • छापचर कूट उत्सव : मिझोराम
  • वांगला आणि नोङ्क्रेम उत्सव : मेघालय
  • नुआखाई : ओदिशा
  • सरहूल, तुसू : झारखंड
  • पोंगल : तामिळनाडू
  • हरेली : छत्तीसगढ़
  • तिज : उत्तर भारत
  • छट पूजा : बिहार
  • ओणम : केरळ
  • लोसार उत्सव : सिक्कीम
  • गोची उत्सव : हिमाचल प्रदेश

Contact Us

    Enquire Now