कांगो देशात सापडला सोन्याचा डोंगर
- कांगो देशातील किवू प्रांतातील एका गावात मुबलक प्रमाणात सोन्याचे प्रमाण असणारा डोंगर सापडला आहे. या डोंगरावरील मातीत ६०-९० टक्के सोन्याचे प्रमाण आढळते.
- ही माहिती पसरताच स्थानिक लोकांनी आपली अवजारे घेऊन येथे गर्दी केली आणि त्यांनी डोंगर खोदण्यास सुरुवात केली.
- कांगोमध्ये मोठ्या प्रमाणात सोने सापडते. देशातील किंमती धातूंची अनेक देशांमध्ये अवैध तस्करी केली जाते. देशातील अनेक भागात सोन्याच्या खाणी आहेत.
- कांगोमध्ये पुष्कळ नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. देशात तेल, हिरे, खनिज आणि विविध प्रकारचे लाकडे आढळतात. देशात टीन, टंगस्टन आणि विविध धातूंचे भांडार आहे.
- कांगो सरकारने तत्काळ आदेश देत खोदकाम थांबवण्यास सांगितलं आहे. शिवाय या ठिकाणच्या सुरक्षेसाठी पोलिसांना तैनात केले आहे.