
ओदिशामध्ये नौखाई उत्सव साजरा
- ओदिशामध्ये ११ सप्टेंबर २०२१ रोजी नौखाई (Nuakhai) हा कृषी उत्सव साजरा करण्यात आला.
- दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव ओदिशा तसेच छत्तीसगडच्या दक्षिण भागात साजरा केला जातो.
- हा उत्सव साजरा करून भाताचे आलेले पीक कापायला शेतकरी सुरुवात करतो.
भारतातील काही महत्त्वाचे कृषी उत्सव
१) पोंगल – तमिळनाडू
२) बैसाखी – पंजाब, हरियाणा
३) लोहरी – पंजाब
४) ओणम – केरळ
५) बीहू – आसाम
६) मकरसंक्रांती – महाराष्ट्र