आशियाई विकास बँकेच्या उपाध्यक्षपदी अशोक लवासा
-
- माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आशियाई विकास बँकेच्या (Asian Development Bank) उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.
- अशोक लवासा हे १९८० च्या तुकडीतील निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
- २३ जानेवारी २०१८ रोजी त्यांनी भारतीय निवडणूक आयुक्त म्हणून पदभार सांभाळला होता आणि ते ऑक्टोबर २०२२ मध्ये मुख्य निवडणुक आयुक्त म्हणून काम पाहणार होते.
- अशोक लवासा आता ADB चे उपाध्यक्षपद भूषवतील. ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त दिवाकर गुप्ता यांच्या जागी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली.
- ADB ने लवासा यांना खासगी क्षेत्राचे संचालन आणि सार्वजनिक खासगी भागीदारीसाठी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
- निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी लवासा हे केंद्रीय वित्त सचिव म्हणून नियुक्त झाले.
- त्याआधी ते पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्रालय आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे केंद्रीय सचिव होते.
- लवासा यांनी पॅरिस करारासाठी हवामान बदलांच्या चर्चेसाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आणि भारताच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानास अंतिम रूप देण्यात मोलाची भूमिका बजावली, ज्यात खासगी क्षेत्राचा समावेश होता.
- एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB)
- मुख्यालय – मनिला, फिलीपाईन्स
- अध्यक्ष – मसात्सूमू असाकावा
- भारतीय निवडणूक आयोग – कलम ३२४
- निवडणूक आयोग हा कायमस्वरूपी व स्वतंत्र आयोग आहे.
- स्थापना – २५ जानेवारी १९५०
- त्यामुळे २५ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो.
- महाराष्ट्रात २०१७ पासून ५ जुलै हा दिवस ‘राज्य मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो.
निवडणूक आयोग रचना
- एक मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांना सहाय्य करण्यासाठी काही सहाय्यक निवडणूक आयुक्त असतात. सहाय्यक निवडणूक आयुक्तांची संख्या वेळोवेळी राष्ट्रपती निश्चित करतात.
- नियुक्ती – राष्ट्रपती
- कार्यकाल – भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांचा कार्यकाल ६ वर्षे/६५ वर्षे यापैकी जे आधी पूर्ण होईल इतका असतो.
- निवडणूक आयुक्तांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांइतका असतो.
- राजीनामा – राष्ट्रपती