
आयएनएस तबर
- आयएनएस तबर ही युद्धनौका २७ जून २०२१ रोजी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया या बंदरावर पोहोचली.
पार्श्वभूमी :
- जवळपास दहा देशांच्या मैत्री आणि सामरिक दौऱ्यावर ही आयएनएस तबर कार्यात आहे.
- जगातील सर्वाधिक जलवाहतूक होणाऱ्या अरबी समुद्राशी संबंधित देशांवर सध्या नौदलाचे लक्ष आहे. त्याअंतर्गत युद्धनौका त्या देशांच्या नाविक तळांना वारंवार भेटी देत आहेत.
- यानुसारच ही आयएनएस तबर ही युद्धनौका मुंबईहून रवाना होऊन भूमध्य समुद्रात पोहोचली आहे.
उद्देश :
- अरबी समुद्राशी संबंधित देशांशी संबंध दृढ तसेच वृद्धिंगत करण्याच्या दिशेने नवीन मार्ग शोधणे.
- दौऱ्यांचे नियोजन : पश्चिम नौदल कमांड (मुख्यालय : मुंबई)
आयएनएस तबर :
- फ्रिगेट श्रेणीतील युद्धनौका
- अलेक्झांड्रिया बंदरातून निघण्यापूर्वी आयएनएस तबरने इजिप्तच्या तौशिका या युद्धनौकेसोबत संयुक्त सागरी सरावात सहभाग घेतला.
- या युद्धसरावात डेक लँडिंग ऑपरेशन्स व समुद्राखालील पुनर्भरण ड्रिल्सचा समावेश होता.
आयएनएस तबरचा मैत्री दौरा :
- सप्टेंबरपर्यंत हा दौरा आहे.
- याअंतर्गतच या युद्धनौकेने येमेनजवळील एडनचे आखात, तांबडा समुद्र आणि सुएझ कालव्याला (भूमध्य समुद्र व तांबडा समुद्रादरम्यान) भेट देऊन भूमध्य समुद्रात प्रवेश
- पुढे जिब्राल्टर (स्पेन) सामुद्रधुनीला वळसा घालून अटलांटिक समुद्रातून बाल्टिक समुद्रातील देशांना भेट देईल.
- यादरम्यान इटली, मोरोक्को, फ्रान्स, यूके, रशिया, नेदरलॅण्ड तसेच स्वीडन व नॉर्वे आर्टिक सर्कल जवळील देशांनाही ही युद्धनौका भेट देणार आहे.
पशिक्षाभिमुख माहिती :
भारतीय नौदलाचे कमांड व त्यांचे मुख्यालय
अ) पश्चिम नौदल कमांड – मुंबई
ब) पूर्व नौदल कमांड – विशाखापट्टणम
क) दक्षिण नौदल कमांड – कोची
भारतीय नौदल दिवस : ४ डिसेंबर