आयएनएस तबर

आयएनएस तबर

  • आयएनएस तबर ही युद्धनौका २७ जून २०२१ रोजी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया या बंदरावर पोहोचली.

पार्श्वभूमी :

  • जवळपास दहा देशांच्या मैत्री आणि सामरिक दौऱ्यावर ही आयएनएस तबर कार्यात आहे.
  • जगातील सर्वाधिक जलवाहतूक होणाऱ्या अरबी समुद्राशी संबंधित देशांवर सध्या नौदलाचे लक्ष आहे. त्याअंतर्गत युद्धनौका त्या देशांच्या नाविक तळांना वारंवार भेटी देत आहेत.
  • यानुसारच ही आयएनएस तबर ही युद्धनौका मुंबईहून रवाना होऊन भूमध्य समुद्रात पोहोचली आहे.

उद्देश :

  • अरबी समुद्राशी संबंधित देशांशी संबंध दृढ तसेच वृद्धिंगत करण्याच्या दिशेने नवीन मार्ग शोधणे.
  • दौऱ्यांचे नियोजन : पश्चिम नौदल कमांड (मुख्यालय : मुंबई)

आयएनएस तबर :

  • फ्रिगेट श्रेणीतील युद्धनौका
  • अलेक्झांड्रिया बंदरातून निघण्यापूर्वी आयएनएस तबरने इजिप्तच्या तौशिका या युद्धनौकेसोबत संयुक्त सागरी सरावात सहभाग घेतला.
  • या युद्धसरावात डेक लँडिंग ऑपरेशन्स व समुद्राखालील पुनर्भरण ड्रिल्सचा समावेश होता.

आयएनएस तबरचा मैत्री दौरा :

  • सप्टेंबरपर्यंत हा दौरा आहे.
  • याअंतर्गतच या युद्धनौकेने येमेनजवळील एडनचे आखात, तांबडा समुद्र आणि सुएझ कालव्याला (भूमध्य समुद्र व तांबडा समुद्रादरम्यान) भेट देऊन भूमध्य समुद्रात प्रवेश
  • पुढे जिब्राल्टर (स्पेन) सामुद्रधुनीला वळसा घालून अटलांटिक समुद्रातून बाल्टिक समुद्रातील देशांना भेट देईल.
  • यादरम्यान इटली, मोरोक्को, फ्रान्स, यूके, रशिया, नेदरलॅण्ड तसेच स्वीडन व नॉर्वे आर्टिक सर्कल जवळील देशांनाही ही युद्धनौका भेट देणार आहे.

पशिक्षाभिमुख माहिती :

भारतीय नौदलाचे कमांड व त्यांचे मुख्यालय

अ) पश्चिम नौदल कमांड – मुंबई

ब) पूर्व नौदल कमांड – विशाखापट्टणम

क) दक्षिण नौदल कमांड – कोची

भारतीय नौदल दिवस : ४ डिसेंबर

Contact Us

    Enquire Now