आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘रोबिबार’ ला दोन पुरस्कार –
- सुपरस्टार प्रसेनजित चॅटर्जी व लोकप्रिय बांगलादेशी अभिनेत्री जया आहसान यांनी भूमिका केलेल्या दिग्दर्शक अतनू घोष यांच्या ‘रोबिबार’ (रविवार) या चित्रपटाने माद्रिद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार जिंकले.
- जया आहसान यांना परदेशी भाषा चित्रपटात सर्वोत्कृष्ट लीड अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला तर अतनू घोष यांना सर्वोत्कृष्ट विदेशी भाषेच्या सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्लेचा पुरस्कार मिळाला.
- या महोत्सवाची ऑनलाईन आवृत्ती सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झाली, त्यावेळीच हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.
- रोबिबारने यापूर्वी ‘क्रिटिकल चॉईस फिल्म अवॉडर्स 2020’ या बंगाली प्रकारात मोठा विजय मिळवला.
- अतनू घोष यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट लेखन असे दोन्ही पुरस्कार मिळाले.
- 21 फेब्रुवारीला हा चित्रपट बांगलादेशी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.