अमेरिकेने जागतिक संघटनेला (UN) माघार घेण्यास सूचित केले
- २०१९ मध्ये वुहान प्रांतातील कोविड-१९ उगम लपवण्यासाठी बीजिंग, चीनला मदत करून अमेरिकेने WHO वर ‘चीनची कठपुतली’ असा आरोप केला आहे.
- त्यामुळे अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) माघार घेण्याबाबत औपचारिकरित्या सुचविले आहे.
- २१ जून १९४८ पासून WHO चा भाग असणारा अमेरिका हा सर्वात मोठा निधी पुरवठा करणारा देश असून दरवर्षी ५०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त योगदान देतो.
- जागतिक आरोग्य संघटनेत सामील होताना अमेरिकेने मान्य केलेल्या माघार घेण्याच्या अटींचा एक वर्षाच्या नोटीस कालावधीसह आर्थिक जबाबदार्या पूर्ण करणे आवश्यक आहे.
- यासंदर्भात अमेरिकेला नोटीस कालावधीत म्हणजे ६ जुलै २०२१ पर्यंत काम करावे लागेल.
- या कालावधीत सध्याची व मागील थकीत २०० मिलियन डॉलर्सची थकबाकीदेखील संपविणे आवश्यक आहे.
WHO बद्दल :
- स्थापना : ७ एप्रिल १९४८
- मुख्यालय : जिनिव्हा, स्वित्झर्लंड
अमेरिकेबद्दल :
- राजधानी : वॉशिंग्टन डीसी
- चलन : युनायटेड स्टेटस् डॉलर (अमेरिकन डॉलर)