
अंबरग्रीस – तरंगते सोने
चर्चेत का? :
- नुकतेच मुंबई पोलिसांनी ९ किलो अंबरग्रीसची तस्करी करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक केली आहे.
अंबरग्रीस काय आहे?
- स्पर्म व्हेलच्या आतड्यापासून मिळणारा करड्या-पांढऱ्या रंगाचा मेणासारखा घनपदार्थ असून समुद्राच्या पाण्याने व उन्हामुळे त्यास पांढरा रंग व सुगंध प्राप्त होतो.
- फक्त १ टक्के स्पर्म व्हेलपासून हे अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) प्राप्त होते.
- हा मासा कॅटलफिश व स्क्वीडसारखे मासे खाऊन त्यांचा मांसल भाग पचवतो व हाडांसारखा न पचवलेला भाग आतड्यांमधून अनेक वर्षांच्या कालावधीने तो बाहेर टाकतो, ज्यात अंबरग्रीन (ambergreine) नावाचा घटक असतो. त्यालाच अंबरग्रीस असे म्हणतात.
इतके महत्त्व का?
- व्हेल माशाच्या उलटीचा सुगंधी द्रव्य, मद्य तसेच औषधे तयार करण्यासाठी केला जातो.
- प्राचीन इजिप्शियन लोक त्याचा धूप म्हणून वापर करत असत.
- सुगंधी द्रव्याची मोठी बाजारपेठ असलेल्या दुबईमध्ये याची मोठी मागणी आहे.
- घरात ठेवणे शुभ मानले जाते.
किंमत : १ किलो = १ कोटी रुपये
धोका:
- अंबरग्रीस मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हेल माशांची तस्करी केली जाते.
- अशा तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात गुजरात किनारपट्टीचा वापर केला जातो.
- स्पर्म देवमाशांना ध्वनी प्रदूषण, हवामान बदल, फिशिंग गिअर्स, जहाज हल्ले तसेच सागरी कचऱ्यात अडकून धोका निर्माण होतो.
स्पर्म व्हेल (कॅशलॉट)
- दात असलेला देवमासा.
- जगभरातील समशितोष्ण आणि उष्णकटिबंधीय पाण्यात आढळतात.
संघ (Phylum) | कॉरडेटा |
वर्ग (Class) | सस्तन (mammalian) |
उपवर्ग (Sub-class) | युथेरिया |
ऑर्डर (Order) | आर्टिओटॅक्टिला |
कुटुंब (Family) | फिसेटरिडे |
जाती (Genus) | फिसेटर |
प्रजाती (Species) | मॅक्रोसेफेलस |
संरक्षणविषयक उपाययोजना
अ) आययुसीएन रेड लिस्ट : असुरक्षित
ब) साईट्स (CITES) : परिशिष्ट -I
क) वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ : परिशिष्ट – I