अंबरग्रीस – तरंगते सोने

अंबरग्रीस – तरंगते सोने

 

चर्चेत का? :

 

  • नुकतेच मुंबई पोलिसांनी ९ किलो अंबरग्रीसची तस्करी करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक केली आहे.

 

अंबरग्रीस काय आहे?

 

  • स्पर्म व्हेलच्या आतड्यापासून मिळणारा करड्या-पांढऱ्या रंगाचा मेणासारखा घनपदार्थ असून समुद्राच्या पाण्याने व उन्हामुळे त्यास पांढरा रंग व सुगंध प्राप्त होतो.
  • फक्त १ टक्के स्पर्म व्हेलपासून हे अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) प्राप्त होते.
  • हा मासा कॅटलफिश व स्क्वीडसारखे मासे खाऊन त्यांचा मांसल भाग पचवतो व हाडांसारखा न पचवलेला भाग आतड्यांमधून अनेक वर्षांच्या कालावधीने तो बाहेर टाकतो, ज्यात अंबरग्रीन (ambergreine) नावाचा घटक असतो. त्यालाच अंबरग्रीस असे म्हणतात.

 

इतके महत्त्व का?

 

  • व्हेल माशाच्या उलटीचा सुगंधी द्रव्य, मद्य तसेच औषधे तयार करण्यासाठी केला जातो.
  • प्राचीन इजिप्शियन लोक त्याचा धूप म्हणून वापर करत असत.
  • सुगंधी द्रव्याची मोठी बाजारपेठ असलेल्या दुबईमध्ये याची मोठी मागणी आहे.
  • घरात ठेवणे शुभ मानले जाते.

किंमत : १ किलो = १ कोटी रुपये

 

धोका:

 

  • अंबरग्रीस मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हेल माशांची तस्करी केली जाते.
  • अशा तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात गुजरात किनारपट्टीचा वापर केला जातो.
  • स्पर्म देवमाशांना ध्वनी प्रदूषण, हवामान बदल, फिशिंग गिअर्स, जहाज हल्ले तसेच सागरी कचऱ्यात अडकून धोका निर्माण होतो.

 

स्पर्म व्हेल (कॅशलॉट)

 

  • दात असलेला देवमासा.
  • जगभरातील समशितोष्ण आणि उष्णकटिबंधीय पाण्यात आढळतात.

 

संघ (Phylum) कॉरडेटा
वर्ग (Class) सस्तन (mammalian)
उपवर्ग (Sub-class) युथेरिया
ऑर्डर (Order) आर्टिओटॅक्टिला
कुटुंब (Family) फिसेटरिडे
जाती (Genus) फिसेटर
प्रजाती (Species) मॅक्रोसेफेलस

संरक्षणविषयक उपाययोजना

अ) आययुसीएन रेड लिस्ट : असुरक्षित

ब) साईट्‌स (CITES) : परिशिष्ट -I

क) वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ : परिशिष्ट – I

Contact Us

    Enquire Now