फेशियल रिकाग्निशन तंत्रज्ञान वापरून मिळणार बोर्डिंग पास

फेशियल रिकाग्निशन तंत्रज्ञान वापरून मिळणार बोर्डिंग पास

  • तीन वर्षांच्या विलंबानंतर २०२२ पासून वाराणसी, पुणे, कोलकाता आणि विजयवाडा या चार विमानतळांवर प्रवाशांना बोर्डिंग पास म्हणून फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान वापरता येणार आहे.
  • हे एक बायोमेट्रिक तंत्रज्ञान आहे जे एखाद्या व्यक्तीच्या चेहर्‍याच्या विशिष्ट वैशिष्ट्यांचा वापर करून चेहरा ओळखण्यास मदत करते.
  • यामध्ये व्यक्तींच्या प्रतिमेचा डेटाबेस तयार केला जातो. सीसीटीव्ही फूटेजमधून घेतलेल्या अज्ञात व्यक्तीच्या प्रतिमेचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या तंत्रज्ञानाचा वापर करून डेटाबेसशी तुलना केली जाते व व्यक्तीला ओळखले जाते.
  • या तंत्रज्ञानाने मनुष्यबळाची कमतरता भरून काढली जाऊ शकते व अतिशय कमी वेळेत व्यक्तीची अचूक ओळख दाखविली जाते.
  • या प्रणालीमध्ये अतिशय कमी मनुष्यबळ लागते तसेच नियमित अद्ययावत करण्याची गरज नाही.

आव्हाने

  • गोपनीयतेचे उल्लंघन
  • डेटाबेस तयार करण्यासाठी आवश्यक सुविधांचा अभाव.
  • भारतीय लष्कराकडून महूमध्ये कृत्रिम गुणवत्ता केंद्राची स्थापना
  • भारतीय लष्कराने मध्यप्रदेशमधील महू येथे कृत्रिम गुणवत्ता केंद्राची स्थापना डिसेंबर २०२१ मध्ये केली.
  • त्याचबरोबर एक क्वांटम प्रयोगशाळेचीही स्थापना केली आहे. या स्थापनेमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सहाय्य लाभले.

उद्दिष्टे

  • वरील दोन केंद्रांमार्फत झपाट्याने बदलत्या तंत्रज्ञानानुसार अद्ययावत तंत्रज्ञानात संशोधन केले जाणार आहे.
  • संपर्क तंत्रज्ञानात अधिक सुरक्षितता साध्य करणे.

फायदे

  • भारताला आपत्ती निवारण, वैद्यकीय क्षेत्र लष्करी माहिती यांमध्ये अद्ययावत आणि सुरक्षित संवाद प्रणालीची आवश्यकता आहे. या केंद्रामुळे त्यामध्ये संशोधन केले जाणार आहे.

इतर

  • २०२०च्या अर्थसंकल्पामध्ये ८००० कोटी रुपयांची तरतूद क्वांटम टेक्नॉलॉजी व त्यावर आधारित क्रियांवर पुढील ५ वर्षांसाठी केली आहे.

Contact Us

    Enquire Now